महालक्ष्मी : प्राइम प्लॉट खाजगी डेव्हलपर्सना भाडेतत्त्वावर देणार



भारतीय रेल्वेने (indian railways) मुंबईतील (mumbai) रेल्वेच्या जमिनीचा तुकडा 99 वर्षांसाठी डेव्हलपरना भाड्याने दिला आहे. हा दोन एकरपेक्षा जास्त जमिनीचा भाग शक्ती मिलच्या शेजारी, महालक्ष्मी (mahalaxmi) येथे रेसकोर्सच्या समोर आहे. तसेच हा भाग पश्चिम रेल्वे (western railway) मार्गाला समांतर आहे.

वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या जमिनीच्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा विचार करण्याचे आदेश रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाला (RLDA) देण्यात आले आहेत. या षटकोनी भूखंडाचा आकार 10,801.700 चौरस मीटर किंवा 2.669 एकर (1.08 हेक्टर) इतका आहे. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असेही सांगितले, की “हा रेल्वेचा रिकामा भूखंड आहे, जो गवताने आणि झुडपांनी व्यापलेला आहे.”

रेल्वेच्या या जागेची अंदाजे किंमत 805 कोटी रुपये आहे. रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, प्राइम लोकेशन लक्षात घेता, त्यांना जास्तीच्या किंमतीची अपेक्षा होती. तसेच “प्लॉटचा एफएसआय 4.05 आहे,” असे आणखी एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. 

“मुंबईत लक्झरी आणि उच्चभ्रू गृहनिर्माण तयार करणे अधिकाधिक लोकप्रिय होत असल्याने ही जमीन इस्टेट डेव्हलपरसाठी फायदेशीर ठरेल अशी आमची अपेक्षा आहे.” असे रिअल इस्टेट (real estate) तज्ञांनी सांगितले.

रेल्वे मंत्रालयाने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी (DRP) माटुंगा आणि माहीम (mahim) येथे 47.5 एकर रेल्वे जमीन देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, त्यापैकी 29 एकर जमीन 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. सोन्याची खाण असलेला हा भूखंड केवळ 2,800 कोटी रुपयांना देण्यात आला आहे, त्यापैकी केवळ 800 कोटी रुपयेच आतापर्यंत मिळाले आहेत, अशी खंत रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या जागेवर प्रीमियम हाऊसिंग, व्यावसायिक शॉपिंग कॉम्प्लेक्स, मनोरंजन केंद्रे, सर्व्हिस अपार्टमेंट्स, हाय-एंड हॉटेल्स, एंटरटेनमेंट पार्क्स, ऑफिस स्पेस, मल्टीमॉडल पार्क्स, स्टोरेज सुविधांचे संयोजन प्रस्तावित केले आहे. यातून निर्माण होणारा पैसा रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त सार्वजनिक सुविधा, रेल्वेच डबे तयार करणे, रेल्वे स्थानकांचे बांधकाम आणि पुनर्विकास तसेच प्रवाशांच्या सर्वांगीण फायद्यासाठी वापरला जाईल.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24