फेब्रुवारी 2025 मध्ये मुंबई Metro 3 वरळीपर्यंत धावणार



सोमवारी भूमिगत मुंबई मेट्रो 3 ने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ट्रायलमध्ये मेट्रो आरेहून एक्वा लाइनच्या सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनपर्यंत धावली. माहितीनुसार, मुंबई मेट्रो-3 (दुसरा टप्पा) ही फेब्रुवारी 2025 पर्यंत वरळीतील आचार्य अत्रे चौकापर्यंत प्रवाशांना प्रवास करता येण्याची शक्यता आहे. उर्वरित मार्ग 2025 च्या मध्यापर्यंत कफ परेडपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.  

पुढील आठवड्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी आरे आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) दरम्यान मुंबई मेट्रो 3 (पहिला टप्पा) तसेच ठाणे खाडी पुलाच्या एका कॉरिडॉरच्या एका टप्प्याचे उद्घाटन करतील, तसेच ठाणे रिंग मेट्रोची पायाभरणी देखील करतील.

मुंबईची एक्वा लाइन ही शहरातील पहिली भूमिगत मेट्रो असेल आणि कफ परेड ते विमानतळापर्यंतचा प्रवास वेळ  कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. हे आरे कॉलनी ते कफ परेडपर्यंत 33.5 किलोमीटरचे अंतर कापेल आणि त्यात 27 स्थानके असतील.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) मधील सूत्रांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, “वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स नंतर, ट्रॅक बदलण्यासाठी आणि आरे डेपोकडे परत जाण्यासाठी गाड्यांचा पुढील क्रॉसओवर आचार्य अत्रे चौक आहे. आम्ही काही तांत्रिक बाबींवर काम करत आहोत. पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आरे ते आचार्य अत्रे चौक दरम्यान मुंबईकरांना सेवा देणे शक्य झाल्यास आम्ही पुढील टप्प्यावर जाऊ.”

आरे आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यानच्या 12.5 मार्गाची तपासणी करण्यासाठी आणि प्रमाणित करण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) यांना अर्ज पाठवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी आचार्य अत्रे चौकापर्यंत व्यावसायिक कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास, कफ परेडपर्यंतचा उर्वरित भाग 2025च्या मध्यापर्यंतच लोकांसाठी तयार होईल.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या पलीकडे उर्वरित 21 किमीवर, 92.3% काम पूर्ण झाले आहे. या कामामध्ये रस्त्याचे रीसरफेसिंग, ट्रॅक टाकणे, विद्युतीकरण, स्टेशन्समध्ये सिस्टीम बसवणे, चाचणी, सिस्टम इंटिग्रेशन इत्यादींचा समावेश आहे.

मुंबई मेट्रो 3 चा भूमिपूजन समारंभ 26 ऑगस्ट 2014 रोजी मरोळ, अंधेरी पूर्व येथे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाला होता. त्यानंतर 21 ऑक्टोबर 2016 रोजी बांधकामाला सुरुवात झाली.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24