मुंबईची ट्रॅफिकची समस्या रिंगरोडमुळे कमी होणार



मुंबईकरांचा (mumbai) बहुतांश वेळ हा प्रवासात जातो. मुंबईच्या आसपास असलेल्या ठाणे (thane), कल्याण, डोंबिवली, खोपोली, नवी मुंबई (navi mumbai), पनवेल, वसई, विरार (virar) इत्यादी ठिकाणी राहणारे लोक दररोज दोन ते चार तास प्रवास करतात. त्यामुळे मुंबईकर बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकलेले असतात.

तसेच कोलकाता आणि दिल्लीसारखं मेट्रोचं जाळं मुंबईत नाही. मुंबई (mumbai) ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी मुंबईची वाहतूक व्यवस्था इतर शहरांप्रमाणे सुसज्ज नाही.

दरम्यान, मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएने (मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण) (mmrda) खास योजना तयार केली आहे. इंडियन एक्सप्रेसने एमएमआरडीएच्या या खास योजनेची माहिती दिली आहे.

मुंबई शहर ट्रॅफिक फ्री (वाहतूक कोंडीपासून मुक्त) करण्यासाठी एमएमआरडीएने 58,517 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना पूर्ण झल्यानंतर मुंबई वाहतूक कोंडीतून बाहेर येणार आहे. या योजनेअंतर्गत मुंबईत 90 किलोमीटरचं रस्त्यांचं जाळं तयार केलं जाणार आहे. यामध्ये उड्डाणपूल, महामार्ग आणि अनेक भूयारी मार्गांचा समावेश असणार आहे.

एमएमआरडीने तयार केलेल्या योजनेनुसार मुंबई व उपनगरांमध्ये मिळून सात आऊटर आणि इनर रिंग रोड (ring road)बनवले जाणार आहेत. हे सातही रिंग रोड तयार झाल्यानंतर मुंबईकर 59 मिनिटांच्या आत शहर व उपनगरातील कोणत्याही ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतील. यासह मुंबईचा पूर्व व पश्चिम भाग अनेक रस्त्यांनी जोडला जाणार आहे.

एमएमआरडीएने सांगितलं आहे की, या योजनेद्वारे रस्त्यांचा विकास केला जाणार आहेच, यासह मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांवर जोर दिला जाणार आहे. सर्व योजनांवर मिळून तीन लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 

रिंग रोड कोणत्या मार्गांवर बांधले जाणार?

प्रकल्प

कुठून सुरू होणार?

मार्ग

पहिला रिंग रोड

नरीमन पॉईंट

नरीमन पॉईंट – कोस्टल रोड – वरळी – शिवडी कनेक्टर – पूर्व द्रूतगती मार्ग – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट

दुसरा रिंग रोड

नरीमन पॉईंट

नरीमन पॉईंट – वांद्रे वरळी सागरी सेतू – सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड – पश्चिम द्रुतगती महामार्ग -पूर्व द्रूतगती मार्ग – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट

तिसरा रिंग रोड

नरीमन पॉईंट

नरीमन पॉईंट – वांद्रे वरळी सागरी सेतू – पश्चिम द्रुतगती महामार्ग – जेव्हीएलआर – कांजुरमार्ग जंक्शन – पूर्व द्रूतगती मार्ग एक्सटेन्शन – पूर्व द्रूतगती मार्ग – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट

चौथा रिंग रोड

नरीमन पॉईंट

नरीमन पॉईंट – वांद्रे वरळी सागरी सेतू – वर्सोवा वांद्रे सागरी सेतू – वर्सोवा दहिसर लिंक रोड – गोरेगाव मुलुंड लिंक रोड – पूर्व द्रूतगती मार्ग एक्सटेन्शन – पूर्व द्रूतगती मार्ग – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट

पाचवा रिंग रोड

नरीमन पॉईंट

नरीमन पॉईंट – वांद्रे वरळी सागरी सेतू – वर्सोवा वांद्रे सागरी सेतू – वर्सोवा दहिसर लिंक रोड – भायंदर फाउंटेन कनेक्टर – गायमुख घोडबंदर टनल – ठाणे कोस्टल रोड – आनंद नगर – साकेत फायओव्हर – पूर्व द्रूतगती मार्ग एक्सटेन्शन – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट

सहावा रिंग रोड

नरीमन पॉईंट

नरीमन पॉईंट – वर्सोवा वांद्रे सागरी सेतू – मीरा भाईंदर लिंक रोड – अलिबाग विरार कॉरिडोर – ठाणे कोस्टल रोड – आनंद नगर साकेत फ्लायओव्हर – पूर्व द्रूतगती मार्ग – पूर्व द्रूतगती मार्ग एक्सटेन्शन – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट

सातवा (आऊटर) रिंग रोड

नरीमन पॉईंट

नरीमन पॉईंट – वर्सोवा दहिसर भाईंदर लिंक रोड – उत्तण लिंक रोड – वडोदरा मुंबई एक्सप्रेस हायवे – अलिबाग विरार मल्टीमॉडेल कॉरिडोर – अटल सेतू जेएनपीटी – ऑरेंज गेट टनल – नरीमन पॉईंट


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24