मुलुंड येथील डंपिंग ग्राऊंडवर गोल्फ कोर्सची योजना



मुलुंड डंपिंग ग्राऊंडच्या जागेवर गोल्फ कोर्स (golf course) उभारण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे.

पालिकेने (bmc) प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया यांना या प्रकल्पाचा अभ्यास करण्यास परवानगी दिली आहे.

या संबंधितचे पत्र घनकचरा व्यवस्थापन विभागाने बुधवारी पीजीटीई कडे सुपूर्द केले.

मुलुंड (mulund) डम्पिंग ग्राउंडमुळे या भागात अनेक वर्षे राहिवाशांना दुर्गंधी, प्रदूषण आणि पर्यावरणीय त्रासाला सामोरे जावे लागले.

या कारणास्तव 2018 मध्ये डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी डंपिंग ग्राऊंडवरील संपूर्ण कचरा हटविण्याचे काम पूर्ण झाले.

यानंतर 64 एकर मोकळ्या जागेवर गोल्फ कोर्स उभारण्याचा प्रस्ताव आमदार मिहिर कोटेचा (mihir kotecha) यांनी पालिकेला दिला.

या प्रकल्पामुळे मुलुंडमधील आर्थिक प्रगती, पायाभूत सुधारणा आणि परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी गोल्फ कोर्स हा उपयोगी प्रकल्प ठरू शकतो, असे मत कोटेचा यांनी व्यक्त केले आहे.

या प्रस्तावामुळे परिसरातील जुन्या इमारती आणि वसाहतींच्या पुनर्विकास प्रक्रियेला चालना मिळण्याचीही शक्यता आहे.

तसेच अशा प्रकल्पांमुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगारनिर्मितीची दारेही उघडू शकतात, असा विश्वास मिहीर कोटेचा यांनी व्यक्त केला.

मे महिन्यात उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पाचा विषय राज्य सरकारपुढे मांडण्यात आला होता. त्यानंतर पालिकेने व्यवहार्यता अभ्यासाला परवानगी देत पुढील टप्पा सुरू केला आहे.

मुलुंड डंपिंग ग्राऊंडवरून मोठ्या प्रमाणात कचरा हटवल्यानंतर आता या जागेचा पर्यावरणपूरक आणि विकासाभिमुख वापर करण्याची स्थानिकांची अपेक्षा आहे.

दरम्यान, गोल्फ कोर्स प्रकल्प प्रत्यक्षात राबवला गेल्यास मुलुंडच्या नागरी जीवनमानात सुधारणा होईल, असा विश्वास मिहीर कोटेचा यांनी व्यक्त केला.

मुलुंड डंपिंग ग्राऊंड गेले काही वर्षांपासून बंद आहे. आता या जागेवर सार्वजनिक वापरासाठी किंवा स्थानिकांसाठी उपयोगी तसेच मुलांसाठीही काही उपक्रम राबवले जावेत, अशी मागणी होत आहे.




Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *