प्रभादेवी भागात कंटेनरचा अपघात



मुंबईतील (mumbai) प्रभादेवी (prabhadevi) भागात आज दुपारच्या सुमारास एक कंटेनर (container) बस स्टॉपला धडकला. या धडकेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यात बस स्टॉपचे तसेच कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्रभादेवी येथील सेंच्युरी मिलजवळ (century mill) उताराच्या येथे वेगाने येणाऱ्या कंटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर थेट जाऊन जवळच्या बस स्टॉपला आदळला. नागरिकांनी प्रसंगावधान ओळखून तेथून पळ काढल्याने जीवितहानी झाली नाही.

तसेच दुपारच्या वेळेस रस्त्यावर जास्त वाहनांची वर्दळ नसल्या कारणाने भीषण दुर्घटना टळली. मात्र या अपघातामुळे काही काळ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24