मरिन ड्राईव्हच्या स्वच्छतेवर महापालिका भर देणार



मरिन ड्राइव्ह परिसर स्वच्छ आणि त्याचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवण्यात यावे अशी सूचना मुंबई महापालिका (brihanmumbai municipal corporation) आयुक्त भूषण गगराणी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.

स्वच्छता, पायी चालण्यासाठी मोकळी जागा, उत्तम आसनव्यवस्था यांसह अन्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी भूषण गगराणी यांनी सूचित केले आहे.

नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स परिसरात अनावश्यक असलेले रस्तारोधक काढून टाकण्याची सूचना आयुक्त गगराणी यांनी केली. या परिसराला मुंबईकरांसह (mumbai) देश-विदेशातील पर्यटक भेट देतात.

मरिन ड्राइव्ह (marine drive) परिसर अधिक सुटसुटीत, स्वच्छ ठेवण्यावर भर द्यावा. अनावश्यक सूचनाफलक काढून टाकावेत, परिसरात पायी चालण्याची जागा, नागरिकांसाठी आसने सुस्थितीत ठेवावी, जेणेकरून नागरिक येथे आरामात बसू शकतील.

परिसरातील विजेच्या खांबावर वाहिन्या लोंबकळणार नाहीत याची काळजी घ्यावी. या खांबांची वेळोवेळी रंगरंगोटी करावी, दिव्यांगांच्या व्हीलचेअरसाठी असलेली जागा अधिक सुटसुटीत ठेवा, आदी बाबींकडेही भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

मरिन ड्राइव्ह परिसरातील प्रसाधनगृह व्यवस्थेचीही त्यांनी पाहणी केली. या परिसरातील दुभाजक सतत स्वच्छ ठेवण्यावर भर देणे गरजेचे आहे. आरेचे स्टॉल आणि त्यांच्या रंगरंगोटीमध्ये साम्य ठेवायला हवे. येथे येणाऱ्या नागरिकांना अधिक सुविधा पुरवाव्यात.

संपूर्ण परिसरात महापालिकेच्या (bmc) परवानगीशिवाय कोणीही कोणतेही फलक, पोस्टर लावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही गगराणी यांनी केल्या. मरिन ड्राइव्ह परिसरात पारसी गेटवर दिव्यांचा प्रकाश राहील अशा पद्धतीने दिव्यांची व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी केली.

मरिन ड्राइव्ह परिसरात काही नागरिक दुभाजक ओलांडतात. या समस्येवर तोडगा काढण्याबाबत गगराणी यांनी महापालिका, पोलिस अधिकाऱ्यांना सूचना केल्या. गिरगाव चौपाटी येथील बांधकाम साहित्य काढून तेथे स्वच्छता राखावी.

रस्त्यालगतची पोलिसांची चौकी मागील छोटी चौपाटी येथे हलवावी, असे निर्देश त्यांनी दिले. याच बांधकामात प्रसाधनगृहांची व्यवस्था करावी आणि गिरगाव चौपाटीकडून येणाऱ्या नागरिकांसाठी येथे येण्यासाठी पायवाट साकारण्याचीही सूचना केली.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24