बीडीडी चाळीतील रहिवाशांना नवीन घराची चावी लवकरच मिळणार



वरळी (worli) येथील पुनर्विकास केलेल्या बीडीडी चाळींतील (bdd chawl) रहिवाशांना पुढील आठवड्यात चावीवाटप करण्याबाबत निर्णय होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सोमवारी वॉररूमच्या बैठकीत सांगितले.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत त्यांनी एकूण 33 प्रकल्पांचा आणि त्यात येणाऱ्या प्रशासकीय अडचणींचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी या बैठकीला दांडी मारली होती.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एकूण 33 प्रकल्पांचा आणि त्यात येणाऱ्या प्रशासकीय अडचणींचा आढावा घेतला. यामध्ये बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेसह मुंबईतील (mumbai) विविध वसाहती व प्रकल्पांच्या प्रगतीचा समावेश होता.

वरळी बीडीडी चाळींतील 9,869 पुनर्वसन सदनिकांपैकी 3,888 सदनिकांचे काम प्रगतिपथावर आहे. त्यापैकी 556 सदनिकांच्या हस्तांतरणाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली.

ही इमारत 40 मजल्यांची असून, बीडीडीवासींना येथे 500 चौरस फुटांचे घर मिळणार आहे. मुंबईतील नायगाव आणि एन. एम. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींतील रहिवाशांना ठरलेल्या वेळेत सदनिका देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

याशिवाय, सुरभी गृहनिर्माण संस्था, पोलिस वसाहती, आराम नगर, मोतीलाल नगर, अभ्युदय नगर, वांद्रे रेक्लमेशन, आदर्श नगर, जीटीबी नगर सायन कोळीवाडा, पीएमजीपी वसाहत, पूनम नगर आणि मुंबई महानगर ग्रोथ हब या प्रकल्पांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाने अधिक परिणामकारक आणि नागरिकांना परवडणाऱ्या गृहनिर्माण संधी निर्माण करण्यासाठी त्वरित व योग्य सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

म्हाडाच्या अधिनियमांतर्गत सुधारणा करताना बांधकाम परवानगीसाठी आकारण्यात येणाऱ्या विकासशुल्कावरील दंडनीय व्याजाचा दर कमी करण्याच्या तसेच अतिरिक्त क्षेत्रफळाचा वापर संक्रमण शिबिरासाठी किंवा सोडतीद्वारे विक्रीसाठी करण्याच्या प्रस्तावावरही बैठकीत चर्चा झाली.

‘मुंबईसह राज्यातील सर्व मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ज्या अडचणी येतात, त्यांचे निराकरण वेळेत करावे. तसेच, मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारावेत.

मेट्रो प्रकल्प वेळेत मार्गी लागण्यासाठी कुशल यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे. मेट्रो प्रकल्प तसेच इतर सुविधा प्रकल्पांसाठी लागणारा निधी तातडीने वितरित करण्याची कार्यवाही करावी’, असे निर्देश फडणवीस यांनी बैठकीत दिले.

प्रकल्पांतील अडचणी सोडविण्यासाठी वॉररूम आढावा बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी पुढील बैठकीपूर्वी पूर्ण करण्यात यावी. आवश्यक अशा बाबींसाठी मंत्रिमंडळ बैठकीत विषय आणून ते विषय पूर्णत्वास आणायला हवेत, अशा सूचनाही देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

बैठकीत बीडीडी चाळ, मुंबईतील मेट्रो 4 (वडाळा ते कासारवडवली), मेट्रो 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण), मेट्रो 6 (स्वामी समर्थनगर-विक्रोळी), मेट्रो 2ब (डी. एन. नगर ते मंडाळे), मेट्रो 7अ (अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2), मेट्रो 9 (दहिसर पूर्व ते मिरा भाईंदर), ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्प, बोरिवली ते ठाणे जोडबोगदा प्रकल्प, उत्तन-विरार सी-लिंक, शिवडी-वरळी एलिव्हेटेड कॉरिडोर, दहिसर ते भाईंदर लिंक रोड, गोरेगाव-मागाठाणे डीपी रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि उत्तन सागरी किनारा मार्ग, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर, धारावी पुनर्विकास प्रकल्प, वांद्रे-वर्सोवा सी-लिंक, वाढवण बंदर प्रकल्प आदी प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे यांनी सादरीकरणाद्वारे वॉररूम प्रकल्पांची माहिती दिली.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24