आता रेल्वेतही मिळणार गोड मोदकाचा प्रसाद



गणेशोत्सवानिमित्त  मुंबई (mumbai) -कोकण रेल्वेमार्गे प्रवास गोड करण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोदक (modak) वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे श्री गणेशाच्या आगमनासाठी जाणाऱ्या भाविकांना प्रवासातच गोड प्रसाद मिळणार आहे.

कोकणात जल्लोषात गणेशोत्सव (ganesh chaturthi) साजरा केला जातो. उत्सवाच्या एक ते दोन दिवस आधीच मुंबईत राहणारा कोकणवासी गावाकडे रवाना होतो. यामुळे उत्सवकाळात मुंबई-गोवा रस्त्यासह रेल्वेतही मोठी गर्दी उसळते.

गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वे (central railway), पश्चिम रेल्वे (western railway), एसटी महामंडळ अशा सरकारी यंत्रणांकडून विशेष वाहतूकीची व्यवस्था केली जाते.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार गाडी क्रमांक 22229/30 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-सीएसएमटी वंदे भारत आणि गाडी क्रमांक 22119/20 सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना मोदकांचे वाटप करण्याचे नियोजन आहे.

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अर्थात बुधवार 27 ऑगस्ट ते शनिवार 6 सप्टेंबर अनंत चतुर्दशी या दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाडीत हे वाटप करण्यात येईल, असे आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24