मुंबईत 4 ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता



भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) मते, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाचा जोर ओसरेल. 4 ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहिल. तसेच शहरात हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. तापमान 26°C ते 32°C दरम्यान राहील. 

आयएमडीने 2, 3 आणि 4 ऑगस्ट रोजी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर, 6 ऑगस्टपासून पाऊस थोडा वाढू शकतो. मुसळधार पावसाला विराम मिळाला असला तरी, आर्द्रता जास्त राहण्याची शक्यता आहे.

ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे यासारख्या शेजारील प्रदेशांमध्येही पावसाची तीव्रता कमी होईल. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. परंतु मुसळधार पावसाचा कोणताही इशारा नाही. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर यासारख्या जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची गती कमी होत आहे, हवामान खात्याने अधूनमधून हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे.

विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

त्याउलट,आयएमडीने नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. जिथे पुढील तीन ते चार दिवसांत वादळ, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.

अकोला, अमरावती आणि यवतमाळ सारखे भाग सध्या कोरडे आहेत, परंतु अंदाजानुसार उष्णता आणि आर्द्रता वाढेल, ज्यामुळे रहिवाशांना आरोग्य सल्ला देण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यातील कोकण पट्ट्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि आठवड्याच्या शेवटी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तथापि, आयएमडीने इशारा दिला आहे की, पुढील आठवड्याच्या मध्यापर्यंत पाऊस पुन्हा तीव्र होऊ शकतो, त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि बदलत्या हवामान परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा

मुंबईतील गोठे हद्दपार होणार


मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24