मुंबईतील कसारा लोकल ट्रेनमध्ये दरड कोसळली



मुंबईहून कसाऱ्याला (kasara) जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळल्याची धक्कादायक घटना (accident) घडली आहे. लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते. मुंबई शहर (mumbai) आणि उपनगराला जोडणारी ही महत्त्वाची दुवा आहे.

दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात सध्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे त्याचा पहिला फटका लोकल ट्रेनवर बसताना दिसतो.

संबंधित घटना ही रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारासची असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईहून कसाऱ्याला जाणारी ट्रेन ही कसारा रेल्वे स्थानकाजवळ पोहोचत होती. पण कसारा रेल्वे स्थानकाजवळ एका टेकडीवरची दरड लोकल ट्रेनवर घसरली.

यामुळे लोकल ट्रेनच्या दरवाज्यावर उभे असलेले दोन प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी एका प्रवाशाच्या पायाला गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. मोठे दगड आणि माती लोकल ट्रेनवर कोसळले.

यापैकी काही दगड आणि माती लोकल ट्रेनच्या दरवाजातून आतमध्ये गेले. या घटनेचा फोटो देखील समोर आला आहे. या घटनेनंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे. त्यांच्यावर तिथे उपचार सुरु आहेत. तर स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे.

अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी उपाययोजना केली जात आहे. पण या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने मोठी दरड कोसळली नाही. अन्यथा मोठी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता होती.

तसेच यामुळे मध्य रेल्वेची (central railway) वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळपर्यंत वर्दळीच्या वेळेतही मध्य रेल्वेची वाहतूक संथगतीने असल्याची दिसून आली. तसेच यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील परिणाम झाला.

दरम्यान, सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत. मुंबई, ठाणे (thane), रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतोय. हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी, असं वारंवार आवाहन करण्यात येत आहे. पावसामुळे शक्यतो लोकल ट्रेनच्या दरवाजा असलेल्या भागात उभं राहणं प्रवाशांनी टाळलं पाहिजे. अन्यथा अशाप्रकारच्या घटनांमध्ये हानी होण्याची भीती असते.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24