रक्तपेढ्यांसाठी आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय



राज्यात (maharashtra) आवश्यकता नसताना अनेक रक्तपेढ्यांना सरसकट मान्यता देण्यात आली असताना राज्य रक्त संक्रमण परिषदेने (Health Department) अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

वार्षिक दोन हजार युनिटपेक्षा कमी रक्तसंकलन असलेल्या रक्तपेढ्यांनी शिबिरांचे आयोजन करून, रक्तदानासंदर्भात जनजागृती निर्माण करून रक्तसंकलन वाढवण्याचे निर्देश परिषदेने दिले आहेत.

रक्ताचे योग्य संकलन होत नसेल तर अशा रक्तपेढ्या (Blood Banks) सुरू ठेवण्याचे कारणच काय, असा प्रश्न उपस्थित करून या रक्तपेढ्या बंद करण्याचे संकेत आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

काही महिन्यांपूर्वी राज्यातील (maharashtra) अनेक रक्तपेढ्यांना सरसकट मान्यता देण्यात आली आहे. त्यावेळी दिलेल्या निर्देशांचे पालनही करण्यात आलेले नाही. पश्चिम महाराष्ट्रामधून रक्तपेढ्यांसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत.

लोकसंख्येनुसार रक्तपेढ्यांची उपलब्धता गरजेची असताना अतिरिक्त रक्तपेढ्यांची गरज आहे का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने 21 सप्टेंबर 2015 रोजी दिलेल्या निर्देशानुसार रक्तकेंद्रांचे स्वेच्छिक वार्षिक रक्तसंकलन दोन हजार युनिटपेक्षा अधिक असायला हवे.

या निर्देशांना दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला असला तरी त्याचे पालन केले जात नाही. त्यामुळे अशा रक्तपेढ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये तातडीने सुधारणा करणे अपेक्षित असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिले आहेत.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24