स्वच्छतेच्या क्रमवारीत नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर



स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2024-25 मध्ये महाराष्ट्राने (maharashtra) चार शहरांना सर्वोच्च सन्मान मिळवून सर्वोच्च स्थान पटकावले. यामुळे शहरी स्वच्छता आणि नागरी सहभागाप्रती राज्याची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित झाली.

नवी मुंबईने (navi mumbai) पुन्हा एकदा भारतातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये (clean city) (इंदौर आणि सुरत नंतर) तिसरे स्थान पटकावले. तसेच 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या श्रेणीमध्ये नागरिकांच्या अभिप्रायात सर्वोत्तम शहराचा किताबही पटकावला.

नागरिकांच्या अभिप्राय श्रेणीमध्ये चंद्रपूरने सर्वोत्कृष्ट शहराचा पुरस्कार जिंकून 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या विभागात ठसा उमटवला, तर लातूरला त्याच श्रेणीत सर्वोत्तम घनकचरा व्यवस्थापनासाठी गौरवण्यात आले.


मुंबईलाही (mumbai) सन्मान यादीत स्थान मिळाले, ग्रेटर मुंबईला नवोन्मेष आणि सर्वोत्तम पद्धतींमध्ये सर्वोत्तम राजधानी शहर म्हणून घोषित करण्यात आले.


हेही वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24