मुंबई महापालिका फ्लड गेट्स बांधणार



मुंबईत (mumbai) यंदा 26 मे रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मंत्रालय, केईएमसह अनेक नवीन ठिकाणी पाणी साचले. धुवांधार पाऊस कोसळत असताना भरतीची वेळ असेल तर नाल्यांवाटे शहरात शिरणाऱ्या समुद्राच्या पाण्यामुळे मुंबईत सखल भाग जलमय होतात.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, समुद्राचे हे पाणी शहरात शिरण्यापासून रोखण्यासाठी 20 ठिकाणी फ्लड गेट (flood gates) बसवण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केले आहे. सर्वेक्षणानंतर लवकरच या कामासाठी निविदा काढली जाईल. याचा फायदा अर्थातच पुढील वर्षी पावसाळ्यात होणार आहे.

मुंबईत यंदा 26 मे रोजी कोसळलेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडवली होती. मुंबई महापालिकेने (bmc) यंदाच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईचे केलेले दावे पोकळ ठरले.

मुंबईतील अनेक भागांत पाणी साचल्याने रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यात लोकलसेवाही कोलमडल्याने मुंबईकरांच्या हालांना पारावर उरला नाही. महामार्गांसह अन्य रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली.

काही तासांतच मुंबईत 250 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याने यंत्रणा कुचकामी ठरली. हिंदमाता, मिलन सब-वे, गांधी मार्केट या दरवर्षीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेच.

या शिवाय मंत्रालय, मेट्रो परिसर, केईएम रुग्णालय, वरळी नाका, जे. जे. उड्डाणपुलाखाली आणि कुलाब्यातील काही परिसरात प्रथमच पाणी भरले. गेल्या वर्षी 388 सखल भाग होते, मात्र 26 मे रोजी झालेल्या पावसात आणखी 80 सखल भाग निदर्शनास आले.

नवीन सखल भागांमुळे पाणी भरण्यामागील कारणेही महापालिकेने (bmc) शोधण्यास सुरुवात केली. काही प्रमुख कारणे समोर आल्यानंतर महापालिकेने पावसाळ्यात पाण्याचा निचरा झटपट व्हावा यासाठी पाणी उपसा करणारे पंप वाढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे उपाय करतानाच फ्लड गेटही बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

जवळपास 20 ठिकाणी फ्लड गेट बसवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. यामुळे भरतीच्या वेळी समुद्राच्या पाण्याला शहरात शिरण्यापासून रोखता येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली.

सखल भागात साचनारे पाणी उपसण्यासाठी गेल्या वर्षी महापालिकेने 474 पंप बसवले होते. ही संख्या घटवून यंदा 414करण्यात आली होती. मात्र, 26 मे रोजी पडलेल्या पावसानंतर महापालिकेने यात वाढ केली आहे. यासाठी महापालिकेच्या 24 वॉर्ड कडून ही माहिती मिळवण्यात आली होती आणि त्यानुसार पंपाची संख्या शंभरने वाढवली आहे.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24