नवी मुंबई: 15 दिवसांच्या बाळाला ठेवून आई फरार



लोकलमध्ये 15 दिवसांच्या बाळाचा ठेवून आई फरार झाल्याची घटना नुकतीच उघड झाली. हार्बर रेल्वेमार्गावरील सीवूड्स स्थानकात मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. 30 ते 35 वयोगटातील एका महिलेने सीएसएमटी-पनवेल लोकलमधून प्रवास करताना आपल्या अवघ्या 15 दिवसांच्या तान्ह्या बाळाला बहाण्याने दुसऱ्याच्या हातात देऊन आईने पळ काढला.

लोकलमधील दोन तरुणींना मदतीच्या बहाण्याने बाळ सोपवून ती महिला सिवूड रेल्वे स्थानकावर न उतरता पुढे निघून गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, जुईनगरमध्ये राहणारी दिव्या नायडू (19 वर्षे) आणि तिची मैत्रीण भूमिका माने चेंबूरहून घरी जात होत्या. सदर महिला सानपाडा रेल्वे स्थानकावर लोकलमध्ये चढली.

सीवूड्स स्थानकावर मला उतरायचे असल्याचे सांगून या महिलेने आपल्याकडे बाळ आणि सामान असल्याने उतरताना मदत करावी अशी विनंती दोन तरुणींकडे केली. त्या दोघी जुईनगर येथे न उतरता महिलेला मदत म्हणून सिवूड स्थानकावर खाली उतरल्या.

सीवूडला उतरताना महिलेनं तरुणींच्या हातात बाळ दिलं. या दोन्ही मुली या महिलेचे बाळ घेऊन लोकलमधून खाली उतरल्या पण महिला लोकलमधून न उतरता पसार झाली.

प्रथमदर्शी सामान अधिक असल्यामुळे खाली उतरता आलं नसावं असा अंदाज तरुणींनी लावला. बऱ्याच वेळेपर्यंत वाट पाहूनही ती महिला परत न आल्यामुळे त्यांनी बाळासह घरी जाऊन त्याची काळजी घेतली आणि नंतर वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली.

वाशी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिलेविरोधात भारतीय न्या. संहिता कलम 93 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळ सध्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे. दरम्यान पोलिसांनी चार पथके तयार केले असून याशिवाय सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार महिलेला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सदर महिला ही खानदेश्वर रेल्वे स्थानकावर उतरल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नसल्याने शोध मोहीमेत अडचणी येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. बाळाच्या आईविषयी कोणालाही माहिती असल्यास वाशी रेल्वे पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


हेही वाचा

महाराष्ट्रातील 70 वर्षीय महिला पर्यटकावर हॉटेलमध्ये बलात्कार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24