शालेय बसचालकांची दर आठवड्याला होणार मद्य चाचणी



शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार स्कूल बसचालकांची पार्श्वभूमी तपासणे, दर आठवड्याला त्यांची मद्यपान आणि औषध चाचणी करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेले हे नियम सर्व शाळांसाठी लागू करण्यात आले आहेत.

चालक, सफाई कामगार आणि महिला सेविकांची सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळेस चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अनधिकृत व्यक्ती बसमध्ये प्रवेश करणार नाही. तसेच खासगी वाहनांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चालकाची ओळख व पार्श्वभूमी शाळेला कळवावी, अशी सूचनाही केली आहे.

पालकांनी चालकांची वैयक्तिक माहिती स्वतःकडे ठेवावी, यामध्ये चालकांची पार्श्वभूमी, ज्यामध्ये बेपर्वा ड्रायव्हिंग आणि भूतकाळातील अपघाताच्या घटनांचा समावेश असेल. खाजगी वाहतूक वापरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांनी शाळा व्यवस्थापनाला चालकाची पडताळणी तपशिलांची माहिती देणे आवश्यक आहे.

मुंबईत सध्या सुमारे 6,000 शालेय बस कार्यरत आहेत. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित झाल्याचे स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.

  • बसेसमध्ये जीपीएस सेवा बसवणे
  • सीसीटीव्ही कॅमेरे लावणे
  • बसची तांत्रिक तपासणी दर सहा महिन्यांनी करून आरटीओकडून प्रमाणपत्र घेणे
  • शौचालये, परिसर आणि इतर संवेदनशील ठिकाणी देखरेख ठेवणे
  • शाळा सुटल्यानंतर कोणीही विद्यार्थी शिल्लक राहणार नाही याची खात्री करणे
  • बसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या बसच्या आसन क्षमतेपुरतीच मर्यादित ठेवणे
  • प्रत्येक बसमध्ये एक महिला सेविका अनिवार्य असणे


हेही वाचा

शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकांना ‘ईलेक्शन ड्युटी’


विद्यार्थ्यांना एसटीचे पास शाळेत मिळणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24