मुंब्रा रेल्वे अपघातात 8 प्रवासी मृत्यूमुखी



ठाणे (thane) जिल्ह्यातील मुंब्रा (mumbra) येथून एका मोठ्या आणि विचित्र अपघाताचे (accident) वृत्त समोर आले आहे. मुंब्रा रेल्वे स्टेशनदरम्यान प्रवासी धावत्या ट्रेनमधून बाहेर पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवाशी गंभीर झाल्याचे समजते. मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे ही भयंकर घटना घटल्याचे सांगितले जात आहे.

लोकल आणि एक्स्प्रेसमधून 10 ते 12 प्रवासी खाली पडले आहेत. यापैकी आठ प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. प्रवासी ट्रॅकवर पडल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले असून या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा रेल्वे स्टेशनदरम्यान ही घटना घडली आहे. धावत्या ‘पुष्पक एक्सप्रेस’मधून (pushpak express) 10 ते 12 प्रवासी खाली पडले. या घटनेत आठ प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.

एक्स्प्रेसमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेक प्रवाशी दरवाज्याला लटकले होते. मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे ही भयंकर घटना घटल्याचे सांगितले जात आहे. लोकलच्या दारात उभं असणारे 10 ते 12 प्रवासी धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले.

या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आले आहेत. ही दुर्घटना सोमवारी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान दिवा ते मुंब्रा रेल्वे स्टेशन दरम्यान घडली.

गर्दीच्या वेळेस घडलेल्या या भयंकर घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून रेल्वेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

कल्याणहून सीएमएमटीसाठी निघालेली 8 वाजून 36 मिनिटांला लोकल दिवा ते मुंब्रा स्थनकादरम्यान दुसऱ्या पटरीवर धावणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसला घासली गेली. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. रेल्वे ट्रॅकवर 10 ते 12 प्रवाशी खाली पडले. यात 8 जणांचा मृत्यू झाला.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24