ADHD म्हणजे अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिविटी डिसऑर्डर. या आजाराची लक्षणं लहान मुलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात असल्याचं दिसून येत होते. पण आता ADHD ची लक्षणे मोठ्या व्यक्तींमध्ये देखील दिसत आहेत. ADHD हा एक मेंटल डिसऑर्डर आहे. यामध्ये मेंदूची वाढ ही सामान्याच्या तुलनेत खूप हळूहळू होताना दिसते. यामध्ये ती व्यक्ती कोणत्याही एका गोष्टीवर लक्षकेंद्रित करु शकत नाही. तसेच मल्टीटास्किंग सारख्या गोष्टींचा देखील या सगळ्यावर परिणाम होताना दिसत आहे.
ओहियो स्टेट युनिव्हर्सिटी वेक्सनर मेडिकल सेंटर आणि कॉलेज ऑफ मेडिसिनच्या नवीन अभ्यासात याचा खुलासा झाला आहे की, जवळपास 25% मोठ्या व्यक्तींना एडीएचडीचा त्रास होताना दिसत आहे. म्हणजे चारपैकी एक तरुण यामध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे. 18 ते 44 या वयोगटात 4.4% लोकांना एडीएचडीचा त्रास होताना दिसत आहे. काय आहे या आजाराची लश्रणे आणि तरुण का होत आहेत याचे शिकार.
तरुणांमध्ये का वाढतोय याचा धोका
सोशल मीडियाचा अतिरेकी वापर
अनुवांशिक कारणे
मेंदूची रचना
गर्भधारणेदरम्यान धूम्रपान, मद्यपान, चिंता, ताण
प्रसूतीच्या वेळी ऑक्सिजनची कमतरता
मल्टीटास्किंगचा येणारा ताण
मुले जास्त टीव्ही आणि मोबाईल पाहत असतात.
प्रदूषणासारखी पर्यावरणीय कारणे
निरोगी पोषण आणि आहार
मानसिक ताण
झोपेचा अभाव
शारीरिक हालचालींचा अभाव
कौटुंबिक इतिहास
ADHD ची लक्षणे काय?
कामावरून वारंवार लक्ष विचलित होणे, कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता.
काही प्रकरणांमध्ये, रुग्णाला भीती असते की जर त्याने कामावर जास्त लक्ष केंद्रित केले तर तो चूक करू शकतो किंवा महत्त्वाची माहिती गमावू शकतो.
विसरण्याची समस्या
संभाषणादरम्यान व्यत्यय आणणे किंवा जास्त बोलणे, अचानक एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देणे.
स्वतःबद्दल नकारात्मक विचार करणे
चांगले व्यवस्थापन कौशल्य नसणे, कुठेतरी गोष्टी विसरणे, खोली, घर किंवा डेस्क व्यवस्थित ठेवू न शकणे
वेळेचे व्यवस्थापन न करणे
चिंता, मनःशांतीचा अभाव, नेहमी चिडचिडे आणि वाईट मनःस्थितीत राहणे
2013 च्या एका अभ्यासानुसार, एडीएचडी रुग्ण त्यांच्या शारीरिक आरोग्याकडे आणि आहाराकडे योग्य लक्ष देऊ शकत नाहीत आणि ते योग्यरित्या औषधे देखील घेऊ शकत नाहीत.
2014च्या एका संशोधनानुसार, दारू, तंबाखू आणि ड्रग्जमुळे हा आजार होत नाही परंतु त्यांच्यामुळे सवयी लवकर अडकतात.
ADHD वर उपाय काय?
जर तुम्हाला काही लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जर एडीएचडी सौम्य असेल तर डॉक्टर संज्ञानात्मक थेरपी देतात.
स्ट्रेस मॅनेज करण्याचा प्रयत्न करा, योग-ध्यान करा.
पोषक तत्वांनी समृद्ध असलेले पदार्थ खा.
वेळेवर झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा, पुरेशी झोप घ्या.
(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)