सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर त्यांनी अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, बाजारात मिळणारे निरोगी पदार्थ नेहमीच शरीरासाठी चांगले नसतात. आपला आहार कसा निरोगी ठेवायचा याबाबत ऋजुता दिवेकरने सांगितल्या महत्त्वाच्या टिप्स.
ऋजुता म्हणाली की, आजच्या काळात, जेव्हा सोशल मीडिया आणि मार्केटिंगद्वारे विविध ‘निरोगी’ अन्नपदार्थांची यादी सांगितली जाते. तेव्हा आपल्या शरीरासाठी आणि पर्यावरणासाठी कोणते अन्न चांगले आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
ट्वीक इंडियाच्या यूट्यूब चॅनलवर अभिनेत्री अहसास चन्नाला ऋजुता दिवेकरने सोशल मीडियावर सांगितल्या जाणाऱ्या सगळ्या हेल्थ टिप्स या योग्य नसतात, असं सांगितलं आहे. योग्य आहार ओळखण्याचे दोन मार्ग आहेत, त्यापैकी एक म्हणजे “भाषा”. जर एखादा पदार्थ तुमच्यासाठी खरोखरच चांगला असेल तर त्याचे नाव तुमच्या स्थानिक किंवा प्रादेशिक भाषेत नक्कीच असेल.
ऋजुता यांनी स्पष्ट केले की, आपण हवामान संकटाच्या युगात जगत आहोत, म्हणून आपण जे अन्न खातो ते पर्यावरणपूरक असले पाहिजे. याचा अर्थ असा की, आपण आपल्या आजूबाजूला वाढणारे आणि आपल्या संस्कृतीला ज्ञात असलेले अन्न खावे. ऋजुताने सांगितले की, “जर कोणत्याही अन्न पदार्थाचे नाव फक्त इंग्रजीत असेल आणि तुमच्या स्थानिक भाषेत नसेल, तर ते तुमच्या शरीरासाठी चांगले नाही.”
ऋजुता यांनी पारंपारिक फळे, भाज्या आणि पाककृतींशी संबंध राखण्यावर लक्ष केंद्रित केले. ऋजुता दिवेकर पुढे म्हणाले की, हे केवळ आपल्या आरोग्यासाठीच महत्त्वाचे नाही तर जैवविविधता आणि पर्यावरणीय संतुलनासाठी देखील आवश्यक आहे. म्हणून, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ‘निरोगी’ आहार निवडताना काळजी घ्या. अन्न निवडता तेव्हा ते स्थानिक, पारंपारिक आणि तुमच्या प्रादेशिक भाषेत नाव असले पाहिजे याची खात्री करा. हे केवळ तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर पर्यावरणासाठी देखील फायदेशीर ठरेल.
अशी करा निरोगी आहाराची निवड
ऋजुता दिवेकरने सांगितले की, पारंपारीक फळे, भाज्या आणि इतर अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. ऋजुता दिवेकर पुढे म्हणाली की, हे पदार्थ फक्त आपल्या आरोग्यासाठीच चांगले नाही तर त्यामुळे पर्यायवरण देखील तितकंच चांगल राहतं.