हृदयातील 70% ब्लॉकेजला रिवर्स करतील खालील उपाय, कोलेस्ट्रॉलही राहील कंट्रोलमध्ये


रक्तवाहिन्यांच्या प्रवाहात अडथळा (ब्लॅाक) होणे ही प्रौढांमध्ये दिसून येणारी एक सामान्य समस्या आहे. मात्र याचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात होत नसल्याने भविष्यात गुंतागुंत वाढते. याची कारणे आणि लक्षणे वेळीच ओळखल्यास तुमचे हृदय, मेंदू आणि संपुर्ण आरोग्याचे संरक्षण करता  येऊ शकते. या समस्येस प्रतिबंध हा जागरूकता तसेच योग्यजीवनशैलीची निवड करुन करता येते. याठिकाणी तज्ज्ञांनी जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. 

धमन्या या अशा रक्तवाहिन्या आहेत ज्या तुमच्या हृदयाला रक्त आणि ऑक्सिजन पोहोचविण्याचे काम करतात. ज्यावेळी रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होतो त्यावेळी त्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. परिणामी यामुळे रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयापर्यंत पोहोचत नाही.

हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकसारख्या समस्येत धमन्या बंद(ब्लॅाक) होतात. अनेक लोकांना त्यांच्या पायातील धमन्या ब्लॅाक झाल्याने त्रास होतो. जेव्हा पायांमधील धमन्यांमध्ये प्लेक जमा होऊन रक्तवाहिन्या अरुंद होतात किंवा ब्लॉक होतात, तेव्हा या स्थितीला परिधीय धमनी रोग (पेरिफेरल आर्टरी डिसीज -पीएडी) म्हणतात. हृदयातील बंद असलेल्या धमन्यांप्रमाणेच, पीएडी हाता पायांतील रक्त प्रवाह प्रतिबंधित करते. धमन्यांमध्ये अडथळा कसा निर्माण होतो, कोणती लक्षणे दिसू शकतात आणि तुमच्या रक्तवाहिन्या स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी काय उपाययोजना कराल  हे जाणून घेणे गरजेचे आहे, अशी माहिती डॉ. अशांक बन्सल – व्हॅस्क्युलर इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट यांनी दिली आहे.

रक्तवाहिन्या ब्लॅाक होण्याची कारणे

चरबी साचल्याने तसेच कोलेस्ट्रॅाल जेव्हा आतील भिंतींवर जमा होते तेव्हा धमनी बंद होऊ शकते, ही स्थिती परिधीय धमनी रोग म्हणून ओळखली जाते. हे बहुतेकदा धूम्रपान, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि बैठी जीवनशैली यासारख्या दीर्घकालीन समस्यांमुळे होते. कालांतराने, हे घटक रक्तवाहिन्यांचे  नुकसान करतात, ज्यामुळे पायांमध्ये रक्त प्रवाह कमी होतो आणि वेदना, संसर्ग आणि अगदी अवयव निकामी होण्याचा धोका वाढतो.

लक्षणे कोणती

चालताना पाय दुखणे किंवा क्रॅम्पिंग (ज्याला क्लॉडिकेशन म्हणतात), पायांमध्ये बधीरपणा किंवा अशक्तपणा येणे, थंडी वाजणे, पाय किंवा बोटांवर न बरे होणारे फोड आणि, रंगहीन व चमकणारी त्वचा किंवा नखांची हळूहळू वाढ होणे अशी लक्षणे आढळून येतात. लक्षणे दिसल्यानंतर विलंब न करता वेळीच निदान आणि उपचार करणे गरजेचे आहे.

यावर उपाय काय?

पायांमधील रक्तवाहिन्या ब्लॅाक झाल्यास निदान करण्यासाठी, तज्ञ घोट्याच्या आणि हातातील रक्तदाबाची तुलना करणाऱ्या अँकल-ब्रेकियल इंडेक्स (एबीआय) सारख्या चाचण्यांसह शारीरिक तपासणी करतात. डॉपलर अल्ट्रासाऊंड, सीटी अँजिओग्राफी किंवा एमआर अँजिओग्राफी सारख्या इमेजिंग चाचण्या देखील ब्लॉकेजची व्याप्ती शोधण्यास मदत करतात जेणेकरुन रुग्णांना पुढील उपचारास मदत होऊ शकते.

ब्लॉक झालेल्या पायांच्या धमन्यांसाठी उपचार हे त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. ते जीवनशैलीतील बदल आणि कोलेस्ट्रॅाल, रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी औषधांच्या स्वरुपात सुरू केले जाऊ शकतात. अधिक प्रगत प्रकरणांमध्ये, योग्य रक्त प्रवाह पुनर्संचयित करण्यासाठी आणि गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.

जीवनशैलीत काय बदल कराल? 

पायांमधील रक्तवाहिन्या ब्लॅाक होण्यापासून रोखण्यासाठी निरोगी जीवनशैली राखणे गरजेचे आहे, जसे की नियमित व्यायाम , धूम्रपान टाळणे, संतुलित आहाराचे सेवन करणे आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या दीर्घकालीन आजारांचे व्यवस्थापन करणे. नियमित तपासणीमुळे सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास आणि गंभीर लक्षणे दिसण्यापूर्वी त्यांची प्रगती रोखण्यास मदत होऊ शकते.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

unobet casino