उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर समजले जाते. या ऊसाचा रसामुळे शरीराला गारवा मिळतो. पण हा ऊसाचा रस तुम्ही किती वेळ ठेवू शकता. हा ज्यूस किती वेळानंतर शिळा होतो. कारण अनेकजण ऊसाचा रस काढून तसाच फ्रिजमध्ये ठेवतात. आणि वेळाने पितात. पण तसं करणं शरीसाठी घातक ठरु शकते.
ऊसाचा रस किती वेळात शिळा होतो?
ऊसाचा रस 15 मिनिटांतच शिळा होतो. त्यामुळे तो काढल्या काढल्या प्यावा. ज्यामुळे त्याचे आरोग्यदायी गुण आपल्या शरीराला फायदेशीर ठरु शकतात. ऊसाचा रस खूप वेळ तसाच ठेवल्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होतात. जे बॅक्टेरिया शरीरासाठी घातक असतात. अशा पद्धतीचा रस पिऊन शरीराला नुकसान होईल.
ऊसाचा रस कधी प्यावा?
ऊसाचा रस पिल्याने शरीराला अनेक फायदे होतात. पण जर ऊसाचा रस योग्य वेळी प्यायला गेला तर त्याचे फायदे वाढतात. ऊसाचा रस पिण्याची योग्य वेळ दुपारपूर्वीची आहे. तसेच, उसाचा रस नेहमी बसून प्यावा. आठवड्यातून ३-४ दिवस ऊसाचा रस प्यायल्याने शरीर थंड होते आणि डिहायड्रेशन देखील टाळता येते.
ऊसाचा रस कसा प्यावा?
ऊसाचा रस नेहमी ताजा प्यावा. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेला ऊसाचा रस पिणे टाळा, त्याचा पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. ऊसाच्या रसाचे पोषक तत्व आणि चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात पुदिना आणि लिंबाचा रस देखील घालू शकता. काही लोकांना ऊसाच्या रसात काळे मीठ घालून पिणे देखील आवडते. ताज्या ऊसाचा रस प्यायल्याने शरीर थंड होईल आणि पचनक्रियाही सुधारेल.
बराच काळ साठवून ठेवलेला ऊसाचा रस कधीही पिऊ नये. ऊसाचा रस खूप लवकर खराब होतो, म्हणून काही वेळाने तो पिणे शरीराला हानी पोहोचवू शकते. ऊसाच्या रसाचे फायदे मिळवण्यासाठी, तो नेहमी ताजा प्या.
या लोकांनी ऊसाचा रस पिऊ नये
ऊसाच्या रसात कॅल्शियम, तांबे, मॅग्नेशियम, लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. याशिवाय, त्यात व्हिटॅमिन ए, बी१, बी२ आणि सी देखील असते. ऊसाचा रस पिण्याचे फायदे आहेत, परंतु काही प्रकारच्या लोकांनी उसाचा रस पिणे टाळावे.
- सर्दी किंवा खोकला असेल तर ऊसाचा रस पिणे टाळा.
- तीव्र डोकेदुखी असतानाही ऊसाचा रस पिऊ नये. याचा थंडावा देणारा प्रभाव असतो, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते.
- ऊसाचा रस पचनसंस्थेसाठी चांगला असला तरी, त्याचे जास्त सेवन केल्याने पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
- कोलेस्टेरॉल वाढल्यास ऊसाचा रस पिणे टाळा. ऊसाचा रस खराब कोलेस्ट्रॉल वाढवू शकतो.
ऊसाचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर असला तरी तो मर्यादित प्रमाणात सेवन करावा. ऊसाचा रस जास्त प्रमाणात पिणे देखील आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. तुम्ही दिवसातून १-२ ग्लास ऊसाचा रस पिऊ शकता. बर्फ न घालता ऊसाचा रस पिणे चांगले होईल.