ओल्या केसांना तेल लावल्यास ते झपाट्याने वाढतात? काय आहे सत्य


लांब सडक केस हे महिलांचं सौंदर्य वाढतं. पण त्यांची निगा राखणही तेवढंच कठीण असतं. अनेक महिलांना लांब केस हवं असतात. पण बदलत्या जीवनशैलीमुळे केसांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. कोंड्याची समस्या, केस गळतीसारख्या समस्येने आज असंख्य लोक हैराण आहे. केसाच्या आरोग्यासाठी तेल लावणे गरजेचे आहे, असं घरातील मंडळींसोबत तज्ज्ञही सांगतात. टक्कल राहणे इथे कोणाला पसंत असतं. मग अशावेळी आपणही अनेक उपाय वापरतो. त्यासाठी आपण महागडी औषधांपासून अनेक उपचार घेतो. काही लोक म्हणतात ओल्या केसावर तेल लावल्यास ते झपाट्याने वाढतात. काय आहे यामागील सत्य आज आपण जाणून घेणार आहोत. 

केस चांगले दिसावे म्हणून तरुण असो तरुणी केसाला सिरम किंवा स्प्रे मारतात. पण त्यामुळे अनेक वेळा केसांचा पोत खराब होतो. मग घरगुती उपायानुसार केसाचा आरोग्यासाठी आणि लांब केस वाढीसाठी कोरड्या की ओल्या केसांवर कधी तेल लावणे योग्य असतं पाहूयात. 

ओल्या केसांना तेल लावल्यास काय होते?

होमिओपॅथिक डॉक्टर गणेश पांडे सांगतात की, ओल्या केसांना तेल लावल्याने केसांना पोषण मिळतं. तसंच त्वचेची छिद्रे उघडतात, त्यामुळे केसांच्या मुळांना तेल लावल्याने केसांना फायदा होतो. केसांची चमक कायम राहते. त्याच वेळी, काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, ओल्या केसांना तेल लावल्याने इमल्शन तयार होते. त्यामुळे इमल्शनचे पाणी तेलात मिसळते त्यामुळे केस अडकून राहतात. इमल्शन तयार झाल्यामुळे, टाळूला देखील आर्द्रता मिळते आणि केस गुळगुळीत राहतात, ज्यामुळे केस निरोगी राहतात.

ओल्या केसांना तेल लावावे की नाही?

बहुतेक तज्ज्ञांचे मत आहे की, ओल्या केसांना तेल लावू नये. ओल्या केसांना तेल लावल्याने केसांची मुळे कमकुवत होतात. त्याचबरोबर कोंडा, दुर्गंधी यासारख्या समस्याही दिसू शकतात. त्याचबरोबर ओल्या केसांना तेल लावल्याने केसांना धूळ चिकटते. ओल्या केसांना तेल लावल्याने केस गळतात. 

केसांना तेल कधी लावायचं?

आग्रा येथील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. इशिता राका पंडित सांगतात की, आंघोळीनंतर लगेच केसांना तेल लावू नये. तेल नेहमी आंघोळीच्या अर्धा तास आधी लावावे. त्यानंतर डोके धुवावे. तर आयुर्वेदाचार्य राहुल चतुर्वेदी म्हणतात की केस ओले झाल्यावर किंवा केस पूर्णपणे कोरडे झाल्यावरच तेल लावा. डॉक्टर राहुल सांगतात की, नेहमी रात्री केसांना तेल लावा. रात्री तेल लावल्याने केसांना रात्रभर योग्य पोषण मिळते. 

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24