डायबिटिस ब्लॅक पॅच म्हणजे काय? दंडावरती काळी पट्टी का लावतात?


कतरिना कैफ नुकतीच नवरात्रीच्या कार्यक्रमात दिसली ज्यामध्ये तिने दंडावरती काळी पट्टी लावली होती. यानंतर डायबिटिस ब्लॅक पॅच चर्चेत आलं. कतरिनाला डायबिटिस झाला का? ही काळी पट्टी नेमती कशामुळे लावतात? या ना अशा प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. तर डायबिटिस ब्लॅक पॅच म्हणजे काय? त्याने शरीरातील साखर कंट्रोलमध्ये राहते का?

डायबिटिस ब्लॅक पॅच म्हणजे काय?

ग्लुकोज मॉनिटर पॅचेस असं डायबिटिस ब्लॅक पॅचला म्हटलं जातं. यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे सोपे होते. आजकाल मधुमेहाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी त्यांच्यावर कंट्रोल मिळवणे कठीण होते. हे FDA कडून चाचणी केलेले पॅच आहे. 

डायबिटिस ब्लॅक पॅचचे प्रकार? 

इन्सुलिन पॅच पंप
WebMD च्या मते, सगळ्यात जलद पद्धतीने शरीरातील साखरेचे प्रमाण ओळखण्यास याची मदत होते. एक पॅच जो शरीराला चिकटलेला असतो. ज्यामध्ये लहान प्रमाणात काडतूसाप्रमाणे इन्सुलिन भरलेले असते. हे इन्सुलिन पॅचद्वारे सुईद्वारे रक्तप्रवाहात प्रवेश करते. महत्त्वाचं म्हणजे इन्सुलिन शॉट्स किंवा पेनाद्वारे घेणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत पॅचद्वारे दररोज कमी प्रमाणात इन्सुलिनची आवश्यकता लागते. 

एक्सपिरिमेंट ग्लुकोज पॅच 
WebMD च्या माहितीनुसार, धुम्रपान सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी हे निकोटिन पॅच महत्त्वाचे ठरतात. यामुळे वेदना कमी होतात. यावर अद्याप संशोधन सुरु आहे. 

ब्लड शुगर कंट्रोल करण्याचे फायदे 
रक्तातील साखरेचे प्रमाण कंट्रोलमध्ये न ठेवल्यास हृदयाच्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. मधुमेहींनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी डायबिटिस ब्लॅक पॅचची मदत होते. या पॅचच्या मदतीने धमण्यांच्या अस्तरांना होणारा त्रास टाळू शकतो. 

यामधून काय होतं? 
डायबिटिस ब्लॅक पॅचच्या मदतीने शरीरातील ग्लुकोज मॉनिटरिंग करणे फायदेशीर होते. हृदय निरोगी राहण्यासाठी योग्य ती जीवनशैली फॉलो करण्यास मदत होऊ शकते. नियमित व्यायाम केल्यास शरीरातील योग्य तो बदल जाणवू शकतो. 

कतरिनाने का लावलाय हा पॅच?

कतरिना कैफच्या हातावरील काळा पॅच बहुधा मधुमेहाचा पॅच आहे, ज्याचा वापर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी केला जातो. अशा पॅचला ग्लुकोज मॉनिटर्स (CGM) असेही म्हणतात. हा पॅच बहुतेकदा मधुमेहाने ग्रस्त लोक परिधान करतात. या पॅचमुळे दिवसभर ग्लुकोजच्या पातळीला मॉनिटर करता येते. पण कतरिना कैफच्या मॅनेजरने सांगितले की, हे एक अल्ट्राह्युमन ॲप आहे. या ॲपच्या माध्यमातून शरीराला काय अनुकूल आहे आणि काय नाही हे सांगणारे अन्न शोधले जाते.

फिटनेसाठी वापरतात पॅच 

कतरिना कैफला मधुमेह असल्याची कोणतीही अधिकृत माहिती नाही. पण हे उपकरण आरोग्याशी निगडीत असल्याचं सांगण्यात येतंय. “हे अल्ट्राह्युमन सारखे फिटनेस ट्रॅकर असू शकते, जे रक्तातील साखर, हृदय गती आणि झोपेच्या नमुन्यांचे निरीक्षण करते.” मधुमेहाचे पॅच सामान्यतः टाइप-1 मधुमेह आणि प्रगत टाइप-2 मधुमेह असलेले लोक रक्तातील साखरेची पातळी सतत नियंत्रित ठेवण्यासाठी कॅरी करतात. 

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24