ऑफिसमध्ये सलग खूप वेळ खुर्चीवर बसता? ही सवय अनेक आजारांना देईल आमंत्रण


Continuous sitting work Is Harmful For Health: पूर्वीच्या काळी जास्त लोक अंग मेहनतीची कामे करायचे. पण हळूहळू तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि माणसांची जागा यंत्रांनी घेतली. आज एक बटन दाबून अनेक कामे क्षणार्धात होतात. पण ऑफिसमध्ये किंवा घरातून काम करतानाही 8 ते 10 तास एका जागी खुर्चीवर बसून काम करावे लागते. पण तुम्हाला याचे तोटे माहीत आहेत का?

खुर्चीवर जास्त वेळ बसून काम करणे आहे हानिकारक

डिजिटल युगात जवळपास प्रत्येक क्षेत्रातील कामाचे स्वरूप बैठे असते. दिवसातला जास्त वेळ खुर्चीवर बसण्यात जातो. पण हे कोणी आवडीने करत नाही. तुम्ही घरून काम करा किंवा ऑफिसमधून अनेक तास सलग खुर्ची वर बसणे तुम्ही टाळू शकत नाही. पण रोज इतके तास सलग बसून काम करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. 

या रोगांचा आहे धोका

जर तुम्ही जास्त वेळ खुर्चीवर बसून काम करत असाल तर तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. पण यावर काही उपाय आहेत ज्यामुळे तुम्ही तुमचे आरोग्य चांगले ठेवू शकता. जास्त वेळ खुर्चीवर बसल्याने पाठ आणि मान दुखू शकते. सलग बराच वेळ बसल्याने पाठीच्या कण्यावर दाब पडतो. याशिवाय खांदे जड होऊन दुखायला लागतात. सुरूवातीला थोड्या दिवसांचे हे दुखणे काही काळानंतर कायमची समस्या बनते. 

या समस्येपासून सुटका मिळवणे कठीण असते. पण याशिवाय जास्त वेळ बसून काम केल्याने कॅलरीज बर्न होत नाहीत आणि वजनही वाढते. सलग खूप वेळ खुर्चीवर बसल्याने मानसिक तणावही निर्माण होतो. 
अनेक वेळा असे होते की कामाच्या व्यापातून मोकळा वेळ मिळत नाही. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला थकवा जाणवतो.

हा त्रास कसा टाळायचा?

एखाद्या व्यक्तीने सलग काम करताना दर अर्ध्या तासाला 5 ते 10 मिनिटांनी ब्रेक घेतला पाहिजे. असे केल्याने थकवा कमी होईल आणि शरीरातील रक्तप्रवाह नियमित राहील.

साधारणतः कोणालाही 7 ते 8 तास खुर्चीवर बसावे लागते. त्यामुळे तुम्हाला खुर्चीवर नीट बसता यावे यासाठी तुम्ही चांगली खुर्ची निवडायला हवी. याशिवाय खुर्ची जास्त उंच नसावी हेही लक्षात ठेवा. तसेच तुमचे पाय व्यवस्थित जमिनीला टेकलेले असावेत.

काम करताना तुम्ही वेळोवेळी पाणी प्यायला हवे. यामुळे तुमची पचन क्रिया उत्तम राहते आणि शरीराला ताजेपणाही मिळतो. तसेच घरचे पौष्टिक अन्न खावे. हे उपाय केल्यास तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24