अमेरिकन यूट्यूबरनं ७ महिन्यात कमी केलं ११४ किलो वजन! म्हणाला, आजपर्यंतचा सर्वात मोठा प्रयोग यशस्वी झाला

Viral news : अमेरिकेतील प्रसिद्ध फूड यूट्यूबर निकोलस पेरीने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सात महिन्यात ११४ किलोपेक्षा जास्त वजन कमी केल्याचा दावा केला आहे. पॅरीच्या खुलाशांमुळे त्याच्या प्रेक्षकांना धक्का बसला आहे. पेरी यूट्यूबवर फूड व्हिडिओ ब्लॉगर असून तो जास्त खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा त्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा सोशल मीडिया प्रयोग असल्याचं त्यानं त्याच्या नुकत्याच उपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. पेरीच्या खुलाशांमुळे प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले आहेत. कारण या दोन वर्षांतही तो सतत त्याचे व्हिडिओ पोस्ट करत होता, ज्यामध्ये तो पूर्वीसारखाच लठ्ठ दिसत आहे. पेरी ने हे कसे केले ही त्याने प्रेक्षकांना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24