Drinking water from a plastic bottle: तुम्ही जर प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पीत असाल तर आधीच सावध व्हा. कारण सतत प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पीत असाल तर तुमच्या शरिराराला धोका निर्माण होऊ शकतो. काय आहेत याचे धोके? तुमच्या शरीरावर नेमका कसा होतो परिणाम? सविस्तर जाणून घेऊया.
प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिणं हे नित्याचं झालंय. प्रवासाला निघताना आपण कुठल्याही दुकानातून प्लास्टिकची बाटली घेतो आणि तहान भागवतो.प्लास्टिकची पाण्याची बाटली ही अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत मोडू लागलीये. काही वर्षांपूर्वी प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिणं ही अतिश्रीमंती मानली जायची. पण आता प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पिणं ही रोजची गरज झालीय. काहीजण ऑफिसलाही प्लास्टिकची बाटलीच पाणी पिण्यासाठी वापरतात.
तुमच्या आयुष्यातल्या दैनंदिन गरजांचा भाग बनलेली प्लास्टिकची बाटली आणि त्यातलं पाणी सुरक्षित आहे का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अमेरिकेतल्या नॉर्थ कोलंबिया विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार प्लास्टिक बाटलीतलं पाणी आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचा निर्वाळा देण्यात आलाय. या विद्यापीठाच्या संशोधनानुसार प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीत लाखो प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळून आलेत. नळाच्या पाण्यापेक्षाही प्लास्टिकच्या बाटलीबंद पाण्यात प्लास्टिकचे सूक्ष्म कण कितीतरी प्रमाणात असल्याचं संशोधन सांगतं.
प्लास्टिकमुळं होणा-या प्रदूषणाचा माणसाच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ लागलाय. समुद्रातल्या प्लास्टिकमुळं जैवविविधता धोक्यात आलीय. एवढंच नाहीतर मायक्रो प्लास्टिकचं प्रमाण माशांच्या शरीरातही आढळून आलंय. आता तर प्लास्टिक पाण्याच्या बाटलीतही मायक्रो प्लास्टिक आढळून आल्यानं हे प्रकरण आणखी गंभीर झाल्याचं सांगण्यात येतंय.
बाटलीबंद प्लास्टिकच्या पाण्यातील मायक्रो प्लास्टिकमुळं पोटात जळजळ होणे, हार्मोनल विकार,अवयवांमध्ये मायक्रो प्लास्टिक गोळा होणे अशा प्रकारचे गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात. प्लास्टिक बाटली आणि पाणी याचं नातं तोडण्याची गरज निर्माण झालीय. प्लास्टिकचा वापर कमीतकमी करणे हाच यावर ,सर्वात मोठा उपाय असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
तज्ज्ञ काय देतात सल्ला?
प्लास्टिक बाटलीतलं पाणी पिऊ नये, प्लास्टिक पाऊचमधील पाणी पिणं टाळा, प्लास्टिकच्या बाटलीत खूप दिवस साठवलेलं पाणी पिऊ नये तसेच स्टिल किंवा इतर धातूची बाटली पाणी पिण्यासाठी वापरा असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. पाणी हे माणसासाठी अमृतासमान आहे. पण प्लास्टिकच्या बाटलीत हे पाणी गेलं की त्यात मायक्रो प्लास्टिक मिसळलात. त्यामुळं प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पिऊन आजारी पडण्यापेक्षा पाणी पिण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करा. सगळ्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी शुद्ध असतं हे डोक्यातून काढून टाका. या संशोधनामुळं भविष्यात पिण्याचं पाणी साठवण्यासाठी प्लास्टिक बाटल्यांऐवजी नवा पर्याय शोधावा लागणार आहे.
FAQ
१. प्रश्न: प्लास्टिकच्या बाटलीतील पाण्यात नेमके काय धोकादायक आढळले आहे?
उत्तर: अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधनानुसार, प्लास्टिकच्या बाटलीबंद पाण्यात लाखो सूक्ष्म प्लास्टिक कण (मायक्रोप्लास्टिक) आढळतात. नळाच्या पाण्याच्या तुलनेत हे कण कितीतरी जास्त प्रमाणात असतात, जे शरीरात शिरकाव करून आरोग्याला हानिकारक ठरतात.
२. प्रश्न: प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी सतत पिल्याने शरीरावर काय परिणाम होऊ शकतात?
उत्तर: मायक्रोप्लास्टिकमुळे पोटात जळजळ होणे, हार्मोनल असंतुलन, अवयवांमध्ये प्लास्टिक कण जमा होणे यासारखे गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे जैवविविधतेवर आणि मानवी आरोग्यावर दीर्घकाळ विपरीत परिणाम होतो.
३. प्रश्न: प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी टाळण्यासाठी तज्ज्ञ काय सल्ला देतात?
उत्तर: प्लास्टिकच्या बाटली किंवा पाऊचमधील पाणी पूर्णपणे टाळा, जुन्या प्लास्टिक बाटलीत साठवलेले पाणी पिऊ नका. त्याऐवजी स्टील किंवा इतर धातूच्या बाटलीचा वापर करा आणि प्लास्टिकचा वापर शक्य तितका कमी करा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.