एका चुकीमुळे येऊ शकतं तुमच्या फुफ्फुसांचे आरोग्य धोक्यात; हिवाळ्यातलं ‘साइलेंट थ्रेट’!


Lung Health: हिवाळ्यात हवा कोरडी होणे, प्रदूषण वाढणे आणि AQI सतत ‘खराब’ पातळीवर जाणे—या तिन्ही गोष्टींमुळे घरातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात बिघडते. अशा वेळी एअर प्युरीफायर्सचा वापर अपरिहार्य बनतो. परंतु, प्युरीफायर सतत चालू ठेवल्यास घरातील आर्द्रता घटते का आणि त्यामुळे फुफ्फुसांना त्रास होतो का, हा प्रश्न अनेकांना पडतो. याच पार्श्वभूमीवर आम्ही तज्ज्ञांकडून याबाबतचे वैज्ञानिक स्पष्टीकरण जाणून घेतले. वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथील कन्सल्टंट पल्मनोलॉजिस्ट डॉ. सुलेमान लधानी यांनीही हे खरं असल्याचं सांगितलं.

Add Zee News as a Preferred Source

“एअर प्युरीफायर्स थेट ओलावा कमी करत नाहीत, पण बंद खोलीत ते सतत हाय मोडवर चालू ठेवल्यास घरातील आर्द्रता घटते. कमी आर्द्रतेमुळे नाक, घसा आणि श्वसनमार्गाची आवरणं संवेदनशील होतात. त्यामुळे कोरडेपणा, खवखव, खोकला, आणि डोळे जळजळणे यांसारखे त्रास होऊ शकतात. स्वच्छ हवा महत्त्वाची आहे, पण फुफ्फुसांना स्वच्छ आणि किंचित आर्द्र हवा  सर्वात जास्त आवडते,” असे डॉ. लधानी म्हणाले.

 प्युरीफायरचा वापर कमी करावा का?

डॉ. लधानी यांच्या मते, AQI खूप वाढलेल्या दिवसात, विशेषतः मुलांसाठी, ज्येष्ठांसाठी आणि दमा⁠/⁠अॅलर्जी असलेल्या लोकांसाठी, प्युरीफायर आवश्यकच असतात. “उपाय म्हणजे ते बंद करणं नाही; तर योग्य पद्धतीने वापरणं. ऑटो मोडचा वापर करा, काही तासांनी मशीन बंद ठेवा, आणि खोली पूर्णतः सील करून दीर्घकाळ चालू ठेवणं टाळा. योग्य ओलावा राखण्यासाठी प्युरीफायरसोबत ह्यूमिडिफायर, पाण्याचं भांडे किंवा ओला टॉवेल यांचाही उपयोग होतो. घरातील आर्द्रता आदर्शपणे 40–60% दरम्यान असावी,” असे त्यांनी सांगितले.

घरातील हवा खूप कोरडी झाल्याचे कसे कळते?

सतत घसा खवखवणे, सकाळी नाकातून रक्त येणे, कोरडा खोकला, त्वचेला जाणवणारा कोरडेपणा, किंवा श्वसनमार्गात खडबडीतपणा जाणवणे—ही सर्व लक्षणे हवेतील अत्यल्प आर्द्रतेची संकेत असू शकतात.
“लोक यासाठी प्रदूषणालाच दोष देतात, पण घरातील कोरडी हवा हे दुर्लक्षित कारण असतं,” असे डॉ. लधानी म्हणाले.

हवा अधिक निरोगी कशी ठेवता येईल?

प्युरीफायरचा मर्यादित वापर करा; सतत ‘टर्बो’ मोडवर ठेवू नका.खोलीला ओलावा द्या—ह्यूमिडिफायर, पाण्याची वाटी किंवा ओला टॉवेल मदत करू शकतात.सॅलाइन स्प्रेने नाकातील ओलावा टिकवा.प्रदूषण कमी असलेल्या वेळेत (सकाळी) खिडक्या उघडून वायुविजन करा. AQI जास्त असताना खिडक्या⁠/⁠दरवाजे बंद ठेवा.प्युरीफायरचे फिल्टर नियमित तपासा आणि बदलत राहा; ब्लॉक झालेली फिल्टर्स कार्यक्षमता कमी करतात.

आणखी काय लक्षात ठेवावे?

घरातील रोपं प्युरीफायरची किंवा व्हेंटिलेशनची जागा घेऊ शकत नाहीत, पण ते वातावरणात थोडा ओलावा वाढवतात आणि खोली अधिक सुखद बनवतात. “त्या उपयोगी असल्या तरी मुख्य उपाय म्हणून नाही—फक्त पूरक म्हणून पहावीत,” असे डॉ. लधानी म्हणाले. बाहेरची हवा अत्यंत प्रदूषित असली तरी तुमचं घर अधिक सुरक्षित श्वसनस्थान बनवता येऊ शकतं. “गर्भित मुद्दा एकच—स्वच्छ हवा आणि योग्य आर्द्रता यांचा समतोल राखा. फक्त स्वच्छ हवा पुरेशी नाही; स्वच्छ आणि आरामदायी ओलाव्याची हवा फुफ्फुसांसाठी सर्वाधिक हितकारक आहे,” असे डॉ. लधानी यांनी सांगितले.

FAQ

१. प्रश्न : एअर प्युरीफायर चालू ठेवल्याने खरंच घरातील ओलावा कमी होतो का?

उत्तर : होय, थेट नाही पण अप्रत्यक्षपणे होतो. बंद खोलीत प्युरीफायर सतत हाय किंवा टर्बो मोडवर चालू ठेवला तर हवेचा ओलावा खूप कमी होतो. यामुळे नाक-घसा कोरडा पडणे, खवखवणे, खोकला, डोळे जळजळणे असे त्रास होऊ शकतात. पल्मनोलॉजिस्ट डॉ. सुलेमान लधानी यांनीही हे मान्य केलंय.

२. प्रश्न : मग प्रदूषण जास्त असताना प्युरीफायर बंदच करायचं का?

उत्तर : अजिबात नाही! विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा-ॲलर्जीचे रुग्ण असतील तर प्युरीफायर बंद करू नका. फक्त योग्य पद्धतीने वापरा:  ऑटो मोड लावा  
काही तास चालवून थोडा वेळ बंद ठेवा  
खोली पूर्ण सील करू नका  
सोबत ह्यूमिडिफायर, पाण्याची वाटी किंवा ओला टॉवेल ठेवा
आदर्श ओलावा ४०-६० टक्के ठेवा.

३. प्रश्न : घरात हवा खूप कोरडी झाली आहे हे कसं कळेल आणि काय करावं?

उत्तर : ही लक्षणं दिसली तर समजावं की ओलावा खूप कमी आहे:  सकाळी नाकातून रक्त येणे  
घसा सतत खवखवणे, कोरडा खोकला  
त्वचा खूप कोरडी पडणे  
श्वास घेताना खडखडाट जाणवणे

उपाय:  प्युरीफायर कमी वेळ चालवा  
ह्यूमिडिफायर किंवा पाण्याचं भांडं ठेवा  
नाकात सॅलाइन स्प्रे टाका  
सकाळी AQI कमी असताना खिडक्या १५-२० मिनिटं उघडा  
घरात हिरवी रोपं ठेवा (थोडा ओलावा वाढवतात)





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *