Eye Care: दृष्टी कमी होण्याची सुरुवातीची ‘ही’ लक्षणे दुर्लक्षित करू नका! आधीच व्हा सावधान


Which Early Signs of Vision Loss You Should Never Ignore: वय कोणतेही असो, जर डोळ्यांनी दिसत नसेल किंवा कमी दिसत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे डोळ्यांना कमी दिसू लागते. परंतु अशी काही प्रारंभी लक्षणे आहेत ज्यांच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो आणि त्याकडे कानाडोळा करू नये. याबद्दल अधिक जाणून घेऊयात डॉ अग्रवाल्स् आय हॉस्पिटल, पिंपरी चिंचवडचे कन्सल्टंट ऑप्थॅल्मोलॉजिस्ट डॉ. सोनल एरोले यांच्याकडून… 

Add Zee News as a Preferred Source

अस्पष्ट दिसणे

वय कोणतेही असो, हळूहळू किंवा मग अचानकच चष्मा घालूनही दृष्टी धुसर होऊ शकते, आणि याची लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे. प्रौढ व्यक्तींना मोतीबिंदूमुळे हळूहळू कमी दिसू लागू शकते आणि अचानक कमी दिसण्याची कारणे म्हणजे रेटिना वेगळा होणे (रेटिनल डिटॅचमेंट), रेटिनाची शिर किंवा धमनी यांमध्ये अडथळा निर्माण होणे, मधुमेह संबंधी रेटिनोपॅथीमध्ये बदल होणे ही असतात आणि त्यात व्हिट्रीयस हेमोर्र्हेज सामील असून त्यांच्यामुळे अचानकच दृष्टी जाऊ शकते व शक्य तितक्या लवकर हे कळविले पाहिजे.

  • मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये अस्पष्ट दिसणे ऑप्टिक न्यूरायटीससारख्या प्रकरणांशी संबंधित असू शकते.
  • प्रकाशाच्या सभोवताली दिसणारे वलय हे मोतीबिंदूमध्ये तसेच काचबिंदू म्हणजेच ग्लुकोमामधील बदल सूचित करतात.
  • रेटिना फाटल्याने आणि रेटिना वेगळा झाल्याने अचानक क्षणिक लख्ख प्रकाश (फ्लॅशेस) किंवा गोष्टी तरंगताना (फ्लोटर्स) दिसू लागतात.
  • मधुमेहामुळे होणारे रक्तस्त्राव, रेटिनाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांमुळे किंवा ग्लुकोमामुळे सुद्धा आपल्या डोळ्यांसमोर काळे डाग दिसू शकतात.
  • बऱ्याच वेळा मस्तिष्क तंत्रिकेत अर्धांगवायू (क्रॅनियल नर्व्ह पाल्सी) सारख्या न्यूरोलॉजिकल अवस्थांमुळे गोष्टी दुहेरी दिसू लागतात.
  • वयामुळे होणारे मॅक्युलर डिजनरेशन किंवा सेंट्रल सिरस रेटिनोपॅथी अशा मॅक्युलाशी संबंधित समस्यांमुळे प्रतिमा वाकड्या-तिकड्या किंवा विद्रुप दिसू शकतात.

म्हणून नोंदविल्यानुसार, वरील सर्व बाबी दृष्टी कमी होण्याची प्रारंभी लक्षणे असू शकतात आणि ही जर लवकर कळली, तर परिणामकारक सुधारणा केल्या जाऊ शकतात, दृष्टी जपता येते आणि पुढे जाऊन दृष्टी जाणे रोखता येऊ शकते आणि त्यावर उपचार केले जाऊ शकतात.

म्हणून जर आपल्याला अस्पष्ट दिसत असेल, गोष्टी दुहेरी दिसत असतील, काळे डाग दिसत असतील, डोळ्यांपुढे क्षणिक लख्ख प्रकाश (फ्लॅशेस) किंवा गोष्टी तरंगताना दिसत असतील (फ्लोटर्स) अथवा कोणत्याही सामान्य वस्तू तिच्या वास्तविक स्वरूपापेक्षा विद्रूप दिसत असेल, म्हणजेच प्रतिमा विद्रूप दिसत असेल, तर आपण नक्कीच याची दखल घेतली. नंबरचा चष्मा लावावा लागणाऱ्या, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या आणि कुटुंबात ग्लुकोमाचा इतिहास असलेल्या 50 वर्षांहून मोठ्या सर्व जेष्ठ रुग्णांनी विशेषतः सतर्क राहिले पाहिजे, काळजी घेतली पाहिजे आणि या लक्षणांबद्दल त्वरित कळविले पाहिजे. तसेच त्यांनी दरवर्षी किमान एकदा डोळ्यांची तपासणी करून घेतली पाहिजे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *