या जगात जेवढी माणसं आहेत, तेवढं त्यांचे वेगवेगळ्या सवयी असतात. खास करून झोपबद्दल अनेकांच्या वेगवेगळ्या सवयी असतात. कोणाला शांत झोपेसाठी खास त्यांची आवडीची मऊ उशी लागते. तर काहींना खोलीत अंधार असेल तरच झोप लागते. तर काहींना त्यांची आवडीची जागा, पांघरून, अगदी मस्त थंडी हवा लागते. पण काहींना लोकांना अशी सवय असते की, एसी लावायचा, मस्त ब्लँकेट घ्यायचं पण हो, पाय मात्र ब्लँकेटच्या बाहेर ठेवायचे. ही सवय नाही यामागील वैज्ञानिक कारणं असतात. ही काय कारणं आहेत, आज आपण जाणून घेणार आहोत.
पहिले कारण – चादरीखाली गुदमरल्यासारखं वाटतं
वैज्ञानिक कारणं असं आहे की, अनेक लोकांना जड रजाई किंवा ब्लँकेटखाली गुदमरल्यासारखे वाटतं. अगदी थोडीशी बंधनाची भावना ज्यांना शांत झोपण्यासाठी अडचण निर्माण करते. अशा परिस्थितीत, अगदी फक्त एक पाय बाहेर काढला तरी त्यांना स्वातंत्र्याची भावना निर्माण होते. हा छोटासा बदल मज्जासंस्था शांत करतो आणि शरीराला झोपण्यास मदत करतो.
बालपणीच्या सवयी…
अनेकांची बालपणाची सवय मोठ्यापणीही त्यांच्यासोबत असते. जसे की आवडत्या ब्लँकेटमध्ये झोपणे, उशीखाली हात ठेवणे किंवा एक पाय बाहेर ठेवून झोपणे. जर्नल ऑफ सायकोसोमॅटिक रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून असं दिसून आलंय की या सवयी कायम राहतात कारण त्या मेंदूला सुरक्षितता आणि आरामाचा संदेश देण्यास मदत करतात. यामुळे ताण कमी होऊन शांत झोपण्यास मदत होते.
सूक्ष्म-स्वातंत्र्याची भावना!
अनेकांना तणावाची भावना असल्याने झोप लागण्यास त्रास होतो. हा एक मानसिक समाधानाचा भाग आहे, जेव्हा ती व्यक्ती पांघरूनातून पाय बाहेर काढल्यास ते मिळतं.
मेंदूसाठी ‘झोपेचा संकेत’…
अनेकांना शरीराला झोपेचे संकेत देण्यासाठी रुममधील दिवे मंद करणे, पायमोजे घालणे अशा सवयी म्हणजे चला झोपेची वेळ झाली. अशा प्रकारे अनेक जण मेंदूला झोपेचे संकेत देत असतो.
तर अनेकांना झोपेत हालचाली करण्याची सवय असते. खरं तर त्यामागे अनेक वेळा दिवसभरातील थकवा किंवा चिडचिड त्यातून दिसते. दिवसभराचा हा ताण अनेक वेळा झोपेवर परिणाम करतो.
उत्तम आरोग्यासाठी चांगली झोप ही फार आवश्यक असते. त्यामुळे तुमची ही एक छोटीशी सवय चादरीबाहेर पाय काढणे नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.