हिवाळ्यातलं ऊन ऊबदार वाटतं पण…, ‘सनबाथ’बद्दलचा सर्वात मोठा गैरसमज ऐकून थक्क व्हाल!


Sunbathing Misconception: अनेकांना वाटतं की थोडं ऊन मिळालं की ड जीवनसत्त्वाची शरिराची गरज पूर्ण झाली. मात्र प्रत्यक्षात असं नसतं. शरिराची प्रक्रिया यापेक्षा जास्त गुंतागुंतीची असते. सूर्यप्रकाश आवश्यक असतोच पण उन्हात जाणे  आणि शरीरात जीवनसत्त्व D तयार होणे  या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हिवाळ्यातला सूर्य तुम्हाला फसवतो? असं तुम्हाला कोणी सांगितलं तरी ते खोटं ठरणार नाही. ‘सनबाथ’बद्दल काही गैरसमज समजून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

भारत उष्ण कटिबंधातील देश असला तरीही विशेषत: शहरांमध्ये जीवनसत्त्व D ची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येते. हिवाळ्यात ऊन ऊबदार वाटते, पण त्यात UVB किरणे खूप कमी असतात. Vitamin D फक्त UVB किरणांमुळेच त्वचेत तयार होते. त्यामुळे फक्त बाहेर उभे राहिले तरी पुरेसे Vitamin D मिळत नाही. ‘हिवाळ्यामध्ये हवामान, प्रदूषण आणि जीवनशैली या सगळ्याचा एकत्रित परिणाम Vitamin D तयार होण्यावर होतो, असे वॉकहार्ट हॉस्पिटल्सचे एंडोक्रायनोलॉजिस्ट व डायबेटोलॉजिस्ट डॉ. प्रणव घोडी सांगतात.

शहरातील जीवनशैली मोठी अडचण

सकाळी 10 ते दुपारी 2 ही UVB किरणे जास्त असतात तेव्हा बहुतांश लोक ऑफिसात किंवा घरी असतात. त्यामुळे त्वचेला पुरेसा सूर्यप्रकाश मिळतच नाही. प्रदूषणामुळेही UVB किरणे अडतात.

थंडी आणि कपडे त्वचा झाकतात

हिवाळ्यात थंडीमुळे लोक एकावर एक कपडे घालतात. परिणामी शरीराची त्वचा पूर्णपणे झाकली जाते, त्यामुळे UVB किरणे त्वचेपर्यंत पोहोचत नाहीत. हिवाळ्यातील प्रदूषणही जास्त असल्याने अजून अडचण वाढते.

गडद त्वचा असल्यास…

भारतीयांची त्वचा गव्हाळ ते काळी असते. मेलेनिन जास्त असल्याने ही त्वचा नैसर्गिक सनस्क्रीनसारखी काम करते. त्यामुळे गोऱ्या त्वचेच्या लोकांपेक्षा आम्हाला Vitamin D तयार करण्यासाठी खूप जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहावे लागते. हिवाळ्यात तर हे जवळपास अशक्यच होते.

आहाराचा फायदा?

दुधात Vitamin D टाकलेले (फोर्टिफाइड), अंडी, मासे, मशरूम यातून थोडे Vitamin D मिळते, पण ते रोजच्या गरजेचा फक्त १०-२०% भाग पूर्ण करते. शहरात राहणाऱ्या बहुतेकांना हिवाळ्यात फक्त सूर्य आणि आहारावर अवलंबून राहून पुरेसे Vitamin D मिळणे कठीण आहे.

काय काळजी घ्याल?  

हिवाळ्यात Vitamin D ची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.शक्य तेव्हा सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत 20-30 मिनिटे हात-पाय-चेहऱ्याला सूर्यप्रकाश द्या.Vitamin D युक्त आहार घ्या.थकवा, हाड दुखणे, सतत सर्दी-पडसे यासारखी लक्षणे दिसली तर डॉक्टरांकडे तपासणी करा आणि गरज पडली तर सप्लिमेंट्स घ्या, असा सल्ला डॉक्टर देतात. 

FAQ

१. हिवाळ्यात ऊन खूप असूनही Vitamin D का कमी पडते?

उत्तर: हिवाळ्यात ऊन ऊबदार वाटते, पण त्यात UVB किरणे खूपच कमी असतात. Vitamin D फक्त UVB किरणांमुळेच तयार होते. शिवाय थंडीमुळे जास्त कपडे घालतो, प्रदूषण जास्त असते आणि सकाळी १० ते दुपारी २ या मुख्य वेळेत आपण घरात-ऑफिसात असतो, म्हणून पुरेसे Vitamin D मिळत नाही.

२. भारतीयांची त्वचा गडद असल्याने Vitamin D वर काय परिणाम होतो?

उत्तर: भारतीयांची त्वचा गव्हाळ ते काळी असते, त्यात मेलेनिन जास्त असते. मेलेनिन नैसर्गिक सनस्क्रीनसारखे काम करते. त्यामुळे गोऱ्या त्वचेच्या लोकांपेक्षा आपल्याला Vitamin D तयार करण्यासाठी ५-१० पट जास्त सूर्यप्रकाश लागतो. हिवाळ्यात UVB कमी असल्याने ही कमतरता आणखी वाढते.

३. हिवाळ्यात Vitamin D ची पातळी कशी वाढवावी?

उत्तर:  शक्य तेव्हा सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान २०-३० मिनिटे हात, पाय, चेहरा उघडे ठेवून सूर्यप्रकाश घ्या.  फोर्टिफाइड दूध, अंडी, मासे, मशरूम यासारखे Vitamin D युक्त पदार्थ खा.  
सतत थकवा, हाड-सांधे दुखणे, स्नायू कमजोरी, वारंवार सर्दी होत असेल तर रक्त तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने Vitamin D चे सप्लिमेंट्स घ्या.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *