नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, इसमाची गेली स्मृती; काय घडलंय नेमकं?


Vitamin B12 deficiency: ठाण्यात एका इसमाला स्मृतीभ्रषांचा त्रास सुरु झाला. त्याच्या एमआरआय स्कॅन करण्यात आले. यात मेंदू छोटा झाल्याचे दिसले. ज्यामुळे सुरुवातीला डिमेंशिया समजले गेले. पण खरे कारण व्हिटॅमिन बी 12 ची तीव्र कमतरता होती. ज्यामुळे मज्जातंतूंचे संकेत बिघडतात. ही समस्या वेळीच ओळखली तर पूर्ण बरे होऊ शकते, अन्यथा कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते, असे डॉक्टर सांगतात.

Add Zee News as a Preferred Source

शाकाहारी लोकांमध्ये ही कमतरता का येते?

शाकाहारी लोकांमध्ये काही लोक कठोर शाकाहारी असतात. ते धार्मिक कारणांसाठी प्राण्यांच्या उत्पादनांपासून पूर्णपणे दूर राहतात. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता सामान्य आहे. ही व्हिटॅमिन प्रामुख्याने मांस, मासे, अंडी आणि दूध यांसारख्या प्राण्यांच्या पदार्थांमध्ये आढळते. शाकाहारी आहारात ती नैसर्गिकरित्या मिळत नाही. 

भारतात लाखो लोक शाकाहारी असल्याने ही समस्या मोठी आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासानुसार, शाकाहारी महिलांमध्ये 60% आणि पुरुषांमध्ये 40% लोकांना ही कमतरता असते. याची लक्षणे हळूहळू सुरू होतात. सुरुवातीला थकवा जाणवतो. वेळीच तपासणी केली नाही तर मेंदू आणि मज्जातंतूंना कायमस्वरूपी इजा होते. शाकाहारी लोकांना नियमित तपासणी करावी, असा सल्ला डॉक्टर देतात. 

निदान कसे होते?

स्मरणशक्ती हरवणे, कुटुंबातील सदस्य ओळख न पटणे, रस्ते भूलणे यांसारखे त्रास झाले. सुरुवातीला त्याला प्राथमिक डिमेंशिया समजले गेले. एमआरआय स्कॅनमध्ये मेंदूतील बदल दिसले, ज्यामुळे कुटुंब चिंतेत होते. पण रक्त तपासणीत व्हिटॅमिन बी12 चे प्रमाण खूप कमी म्हणजे 203 पिगी/मिलीपासून खाली असल्याचे आढळले. 

निदानासाठी पूर्ण रक्त तपासणी, सीरम व्हिटॅमिन बी12 पातळी, फोलेट, रक्त चित्रण आणि होमोसिस्टीन पातळी तपासली जाते. ही कमतरता मज्जातंतूंच्या आवरणाला (मायेलिन) इजा करते, ज्यामुळे डिमेंशियासारखी लक्षणे दिसतात. हे ओळखणे सोपे नसते. कारण लक्षणे इतर आजारांसारखी वाटतात. डॉक्टरांना वेळीच शंका असली तर रक्त चाचण्या करून हे सिद्ध करता येते. 

काय सावधगिरी बाळगाल?

सुरुवातीला व्हिटॅमिन बी12 चे इंजेक्शन दिले जातात, ज्यामुळे आठवड्यांत लक्षणे कमी होतात. पातळी जास्त असल्यास शाकाहारी लोकांसाठी गोळ्या दिल्या जातात. रुग्णाच्या केस मध्ये उपचारानंतर स्मरणशक्ती आणि विचारक्षमता सुधारली. उपचाराने मेंदूचे बदलही उलटू शकतात. शाकाहारी लोकांनी आहारात दूध किंवा सोयाबीन असे कृत्रिमरीत्या बी12 युक्त पदार्थ  घ्यावेत. दरवर्षी रक्त तपासणी करणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टर देतात. गर्भवती महिलांना आणि वृद्धांना याचा जास्त धोका असतो,असेही डॉक्टर सांगतात. 

प्रतिबंध कसा करायचा?

व्हिटॅमिन बी12 कमतरता ही डिमेंशिया नव्हे, तर उपचारयोग्य समस्या आहे. शाकाहारी लाईफस्टाइल सुंदर आहे पण पोषक द्रव्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित तपासणी, संतुलित आहार यामुळे ही समस्या टाळता येते असे डॉक्टर सांगतात. 

(Disclaimer – येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)

FAQ 

प्रश्न: डिमेंशियासारखी लक्षणे दिसत आहेत, पण मी फक्त ४०-५० वर्षांचा आहे. तरीही मला डिमेंशिया झाला असण्याची शक्यता आहे का?

उत्तर: नाही. तरुण वयात डिमेंशियासारखी लक्षणे दिसली तर प्रथम व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता तपासावी. ही कमतरता मेंदूला आणि मज्जातंतूंना तात्पुरती इजा करते, ज्यामुळे स्मरणशक्ती जाऊ शकते, रस्ते भूलू शकतात आणि लोक ओळख पटेनासे होतात. पण ही खरी डिमेंशिया नसते; उपचाराने १००% बरे होते.

प्रश्न: मी पूर्ण शाकाहारी आहे आणि धार्मिक कारणाने दूध-दहीही खात नाही. मला व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता होऊ शकते का?

उत्तर: होय, खूप जास्त शक्यता आहे. व्हिटॅमिन बी१२ फक्त प्राण्यांच्या पदार्थांमध्ये (मांस, मासे, अंडी, दूध) नैसर्गिकरित्या आढळते. जे लोक दूध-दहीही घेत नाहीत, त्यांच्यात ही कमतरता ७०-८०% पर्यंत आढळते. त्यामुळे दरवर्षी रक्त तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने बी१२ ची गोळी किंवा इंजेक्शन घेणे आवश्यक आहे.

प्रश्न: व्हिटॅमिन बी१२ कमी असल्याचे कसे कळेल आणि उपचार किती दिवसांत गुण येतो?

उत्तर: साध्या रक्त चाचणीत (Serum Vitamin B12 level) लगेच कळते. सामान्य पातळी २००–९०० pg/mL असते; २०० पेक्षा कमी असल्यास कमतरता असते. उपचाराला सुरुवात केल्यानंतर पहिल्या आठवड्यात थकवा, चक्कर कमी होते आणि १-३ महिन्यांत स्मरणशक्ती पूर्णपणे परत येते. लवकर उपचार केला तर मेंदूचे नुकसान पूर्णपणे उलटते.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *