Red Soil Stories या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून फक्त घराघरात नाही तर 40 देशांमध्ये पोहोचलेला शिरीष गवस याचं दुःखद निधन झालं आहे. त्याच्या जाण्याने सोशल मीडियावर आजही दुःख व्यक्त केलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरीष गवस याने गेल्याच महिन्यात मुलगी श्रीजाचा पहिला वाढदिवस साजरा केला. यानंतर 18 जुलै रोजी त्यांच्या युट्यूबवर शेवटची पोस्ट पाहायला मिळाली. यानंतर अवघ्या 10-12 दिवसांतच होत्याच नव्हतं झालं. शिरीष हा अवघ्या 33 वर्षांचा होता. मिळालेल्या माहितीनुसार, शिरीषचं डोकं दुखत होतं. त्याला चक्कर आली आणि तो तब्बल 4 तास बेशुद्ध अवस्थेत होता. त्यानंतर त्याला गोव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये त्याला ब्रेन हॅमरेज झाल्याच डॉक्टरांनी सांगितलं. यानंतर शिरीषवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर शिरीषच्या डोक्यात संसर्ग पसरला आणि यामध्ये त्याचं निधन झालं आहे.
यानंतर ब्रेन हॅमरेज म्हणजे काय? अगदी सुरुवातीलाच शरीरात ‘ही’ 6 लक्षणे दिसतात. ज्याकडे दुर्लक्ष करणे अतिशय घातक ठरु शकतं.
ब्रेन हॅमरेज म्हणजे काय?
तापमानात अचानक होणाऱ्या अशा बदलांशी मेंदू जुळवून घेऊ शकत नाही. मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि रक्तस्त्राव होतो. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूच्या नसा खराब होतात आणि मेंदूतील नसा फुटतात. त्यामुळे मेंदूत रक्तस्त्राव सुरू होतो. जर रुग्णावर वेळेवर उपचार केले नाहीत तर मृत्यू देखील होऊ शकतो.
मेंदूतील रक्तस्त्रावाची लक्षणे
डोकेदुखी – अचानक तीव्र डोकेदुखी हे मेंदूतील रक्तस्त्रावाचे लक्षण आहे. जर अचानक तीव्र डोकेदुखी झाली तर ताबडतोब डॉक्टरकडे जावे. या स्थितीत वेळ वाया घालवू नये.
चेहऱ्यावर सुन्नपणा –जर चेहरा अचानक सुन्न झाला तर. चेहऱ्याव्यतिरिक्त, हात आणि पाय सुन्न होणे हे देखील मेंदूतील रक्तस्त्रावाचे लक्षण असू शकते.
बोलण्यात अडचण – बोलण्यात अडचण येत असल्यास, ताबडतोब डॉक्टरकडे जावे. हे मेंदूतील रक्तस्त्रावाचे लक्षण असू शकते.
उलट्या – उलटी किंवा मळमळ होणे हे देखील मेंदूतील रक्तस्त्रावाचे लक्षण असू शकते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, ताबडतोब डॉक्टरकडे जा.
शरीरात कडकपणा – शरीरात तीव्र कडकपणा हे देखील मेंदूतील रक्तस्त्रावाचे लक्षण असू शकते.
सर्वाधिक धोका कोणाला असतो?
उच्च रक्तदाबाने ग्रस्त रुग्ण, धूम्रपान करणारे लोक आणि हृदयाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांना मेंदूतील रक्तस्त्रावाचा धोका जास्त असतो.
उपाय काय?
उच्च रक्तदाब, धूम्रपान किंवा हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना ब्रेन हॅमरेजचा धोका जास्त असतो. या ऋतूत अशा लोकांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अशा लोकांनी सूर्यप्रकाशातून एसीकडे जाण्यापूर्वी त्यांच्या शरीराचे तापमान सामान्य करावे. अशा ठिकाणी रहा जिथे सूर्यप्रकाश किंवा एसी नाही. अशा ठिकाणी ५ ते १० मिनिटे रहा आणि तापमान सामान्य केल्यानंतरच एसीकडे जा.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)