Brain Affecting Tapeworm Infections: पावसाळा म्हटलं की संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. सर्दी-खोकला यासारखे व्हायरल आजार डोके वर काढतातच. पण त्याचबरोबर डेंग्यू, मलेरिया या सारख्या आजारांमध्ये वाढ होताना दिसते. पण सध्या मुंबईत एका वेगळ्याच आजाराने डोकं वर काढलं आहे. मुंबईतील डॉक्टरांनी मेंदूला संसर्ग होणाऱ्या टेपवर्म किंवा न्यूरोसिस्टीसकोर्सिस संसर्गाविषयी आता धोक्याचा इशारा दिला आहे. या आजाराचा संसर्ग झाल्यास मेंदूत सिस्टस म्हणजेच गाठी तयार होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
न्यूरोसिस्टीसकोर्सिस हा टेनिया सोलीयम म्हणजेच डुकराच्या टेपवर्ममुळं होतो. ह्याचा संसर्ग थेट मेंदूत होतो. या आजाराची लागण अस्वच्छतेमुळं, डुकराच्या मांसाचे सेवन होत असलेल्या ठिकाणी या आजाराचा संसर्ग होतो. कमी शिजवलेले मांस, व्यवस्थित न धुतलेल्या भाज्या हे टेपवर्क अळ्यांचे स्थान आहे. असे पदार्थ खाल्ल्याने परजीवी खाण्यामार्फत मेंदूमध्ये पसरतात ज्यामुळं मेंदूत गाठी तयार होतात.
न्यूरोसिस्टीसकोर्सिसची कारणे काय?
शौचालयानंतर हात न धुणे
टेपवर्मच्या अंड्यांनी दूषित झालेले अन्न किंवा पाणी पिणे
टेपवर्मची लागण झालेल्या व्यक्तीच्या किंवा अस्वच्छ व्यक्तीच्या संपर्कात येणे
न्यूरोसिस्टीसकोर्सिसची लक्षणे कशी ओळखाल?
डोकेदुखी
मळमळ/उलट्या
भ्रम
झटके येणे
दृष्टी समस्या
स्ट्रोकसारखी लक्षणे
न्यूरोसिस्टीसकोर्सिसवर उपचार काय?
मेंदूत पसरलेल्या अळ्या मारण्यासाठी अल्बेन्डाझोल किंवा प्राझिक्वांटेल यासारखी औषधे वापरली जातात. तसंच, मेंदूची सूज कमी करण्यासाठी डेक्सामेथासोनसारखी दाहकविरोधी औषधे किंवा स्टेरॉइड्स दिले जातात. जर प्रकरण गंभीर असेल तर मेंदूतील गाठी काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते.
न्यूरोसिस्टीसकोर्सिसवर टाळण्यासाठी उपाय?
जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा
शौचालय वापरल्यानंतर हात स्वच्छ धुवा
स्वच्छ पाणी प्या
नखे वेळोवेळी कापा आणि स्वच्छ ठेवा
WHO ने नेमकं काय म्हटलं?
जागतिक आरोग्य संघटनेच्यामते, न्यूरोसिस्टीसकोर्सिस हा मज्जासंस्थेच्या प्रतिबंध परजीवी संसर्ग आहे. जो डुकराचे मांस टेपवर्म टेनिया सोलियमच्या लाव्हामुळं मेंदूमध्ये तयार होतो. सुरुवातीला आतड्यांमध्ये संसर्ग होतो. पण वेळीच उपचार न केल्यास या अळ्या स्नायू, त्वचा, डोळे आणि मेंदूत संक्रमण होऊ शकते. हे सिस्ट मेंदूत साचण्यास सुरुवात होतात.
Neurocysticercosis FAQ
Q. न्यूरोसिस्टीसकोर्सिस म्हणजे काय?
ANS: हा पावसाळ्यात होणारा एक संसर्गजन्य आजार आहे.
Q. न्यूरोसिस्टीसकोर्सिस आजार कशामुळं होऊ शकतो?
ANS: दूषित अन्नपदार्थ आणि दूषित पाणी प्यायल्यामुळं हा आजार होऊ शकतो.
Q. न्यूरोसिस्टीसकोर्सिस कसा टाळता येईल?
ANS: या आजाराबाबत जनजागृती करणे तसंच, स्वच्छता राखणे