Hickey or love Bite : प्रेम हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर भावना असते. प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक प्रकार असतात. प्रेमाची भावना आणि शारीरिक जवळीची सुरुवात अनेक जोडपी ही लव्ह बाईट किंवा हिकीने करतात. खास करुन मानेवर दिलेले जाणारे हे लव्ह बाईट अनेक जोडपी लपवतात. ही शरीरावरील थोडी दुखणारी पण हवी हवीशी अशी खूण जेव्हा भावना शब्दांच्या पलीकडे जातात त्या क्षणाची एक गोड आठवण असते. प्रेमात ही जोडी एकमेकांना देणारे हे लव्ह बाईट तुम्हाला सामान्य आणि प्रेमाचं प्रतीक वाटत असेल, पण त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
हो, लव्ह बाईटमध्ये रक्त गोठणे, त्वचा निळी पडणे आणि सूज येणे यासारख्या समस्यांशिवाय, तुम्हाला काही गंभीर समस्यांना देखील तोंड द्यावे लागू शकतं. एवढंच नाही तर या समस्यांमध्ये स्ट्रोक देखील येण्याची दाट शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. लव्ह बाईट किंवा हिकीमुळे होणाऱ्या धोक्यांबद्दल प्रत्येकाला माहिती असणे खूप गरजेचे आहे.
हिकी, ज्याला लव्ह बाईट असेही म्हणतात, तुमच्या त्वचेवर एक खोल लाल किंवा जांभळा रंगाचा डाग असतो जो 20 किंवा 30 सेकंदांपर्यंत त्वचेला चोखल्याने किंवा चावल्याने येतो. सोप्या शब्दांत सांगायचं तर, हिकीनंतर शरीरावर उठलेला डाग रक्त गोठण्यामुळे असतो. खरं तर, जेव्हा तुमचा जोडीदार तुमची त्वचा वेगाने चोखतो किंवा चावतो तेव्हा पृष्ठभागाखालील लहान रक्तवाहिन्या दाबामुळे तुटतात. या तुटलेल्या रक्तवाहिन्यांमधून पेटेचिया नावाचे रक्ताचे छोटे ठिपके पडतात जे शरीरावर दिसतात. ते लाल, निळे किंवा जांभळे रंगाचे दिसतात. वैद्यकीय भाषेत याला हिकीला असं देण्यात आलं आहे.
एकायमोसिस
एरिथेमा
रक्ताबुर्द
पुरपुरा
पेटीचिया
हिकीमुळे या 3 गंभीर आजाराची भीती
1. रक्त गोठणे
लव्ह बाईटदरम्यान तुटलेल्या रक्तवाहिन्यांमधून गोळा केलेले रक्त गोठू शकतं आणि नसांना अडथळा आणू शकतो.
2. स्ट्रोकचा धोका
डॉक्टरांच्या मते, मानेवर जास्त दाब पडल्याने धमन्यांचे नुकसान होऊ शकतं, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.
3. त्वचेवर दीर्घकाळ सूज आणि चट्टे
काही प्रकरणांमध्ये, हिकी झाल्यानंतर त्वचेवर सूज, वेदना आणि खोल खुणा बराच काळ टिकून राहू शकतात.
काही घटनांवर नजर टाकूयात 2011 मध्ये , न्यूझीलंडमधील एका महिलेला हिकीनंतर अर्धांगवायू झाला. आपत्कालीन डॉक्टरांना तिच्या मेंदूत रक्ताची गुठळी आढळली आणि तिला स्ट्रोक असल्याचे निदान झाले. दरम्यान, डेन्मार्कमधील एका 34 वर्षीय महिलेला हिकीनंतर 12 तासांनी स्ट्रोक आला आणि तिच्या शरीराच्या उजव्या बाजूला अशक्तपणा आला.
वेबमेडच्या मते, हिकीमुळे स्ट्रोक येण्यासाठी अतिशय असामान्य परिस्थिती आवश्यक असते. कारण कॅरोटिड नावाची एक मोठी धमनी तुमच्या मानेच्या दोन्ही बाजूंमधून जाते. ती तुमच्या मेंदू, चेहरा आणि मानेला रक्तपुरवठा करते. हिकी दरम्यान कॅरोटिड धमनीवर जास्त दबाव टाकला तर त्यामुळे रक्ताची गुठळी होऊ शकते किंवा आधीच असलेली गुठळी जागेवरून हलू शकते आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. न्यूझीलंड आणि डेन्मार्कमधील महिलांना आधीच धमनी समस्या असू शकतात, ज्यामुळे त्यांना स्ट्रोकचा धोका जास्त असू शकतो.
बंगळुरूमधील स्पर्श रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. नितीन कुमार एन म्हणतात की, लव्ह बाईटला सामान्यतः हलक्यात घेतल्या जातं पण अलिकडच्या काळात काही गुंतागुंतीच्या केसेस दिसून आल्या आहेत. विशेषतः मानेसारख्या संवेदनशील भागावर तीव्र दाब, नसांवर परिणाम करू शकतो.
विशेष काळजी घ्या!
जर एखादी व्यक्ती रक्त पातळ करणारी औषधे घेत असेल, तर त्याने विशेषतः सावधगिरी बाळगली पाहिजे. जर लव्ह बाईटची खूण ही 10-12 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहिले किंवा सूज/वेदना होत असतील, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)