21 दिवस नाभीत तेल टाकल्याने काय होतं?; डॉक्टरांनी सांगितलं कोणते तेल लावावे?


Oil in Your Navel Benefits : शरीरातील अनेक अवयवाचे अनेक वेगवेगळे काम असतात. अनेकांना प्रश्न पडतो नाभी आपल्या शरीरासाठी का महत्त्वाची आहे. तुम्हाला माहिती आहे की, नाभीला तेल लावल्याने शरीरातील लहान मोठ्या आरोग्याचा समस्या दूर होण्यास मदत मिळते. आयुर्वेदात याला नाभी चिकित्सा किंवा पेचोटी विधी असं संबोधलं जातं. नाभी चिकित्सा ही एक खूप जुनी आणि प्रभावी पद्धत मानली जाते. या विधीमध्ये नाभीमध्ये तेलाचे काही थेंब टाकले जातात आणि हलका मालिश करण्यात येतं. आयुर्वेदानुसार, नाभी आपल्या शरीरातील एक असा बिंदू आहे, जो शरीराच्या 72,000 नसांशी जोडला गेला आहे. अशा परिस्थितीत, नाभीत तेल लावल्याने कोणते फायदे मिळतात जाणून घ्या. 

नाभीत तेल लावण्याचे फायदे

योगगुरू हंसा योगेंद्र, ज्यांना डॉ. हंसाजी म्हणून ओळखलं जातं. त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये, योगगुरूंनी सलग 21 दिवस दररोज रात्री नाभीत तेल लावल्याने कोणते फायदे होतात हे सांगितलं आहे. डॉ. हंसा योगेंद्र म्हणतात, तुम्ही या नियमाचं पालन केल्या एकाच वेळी अनेक समस्यांपासून आराम मिळतो, असं त्यांनी म्हटलंय. चला पाहूयात कोणते फायदे होतात ते. 

पचन सुधारते

नाभीच्या खाली एक ‘अग्नि केंद्र’ असते जे पचन आणि मूत्रसंस्थेचे नियंत्रण करते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला अपचन, गॅस, आम्लता यासारख्या समस्यांनी त्रास होत असेल, तर नारळाच्या तेलात आले आणि पुदिन्याचे आवश्यक तेलाचे काही थेंब मिसळा आणि नाभीवर लावा. 21 दिवस असे केल्याने तुमची पचनक्रिया सुधारू शकते. 

त्वचा उजळवते

दररोज रात्री झोपण्यापूर्वी नाभीत नारळ किंवा बदामाचे तेल लावल्याने शरीर आतून हायड्रेट होते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते.

हार्मोन्स संतुलित होतात

नाभीला कोमट एरंडेल तेल लावल्याने हार्मोन्स संतुलित होतात आणि मासिक पाळीच्या वेदना देखील कमी होतात.

दृष्टी सुधारते

सलग 21 दिवस नाभीमध्ये गायीचे तूप किंवा तीळाचे तेल टाकल्याने डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो आणि दृष्टी सुधारते.

ताण कमी करणे आणि झोप सुधारणे

लैव्हेंडर किंवा कॅमोमाइल तेलाने नाभीची मालिश केल्याने ताण कमी होतो आणि चांगली झोप येण्यास मदत होते.

शरीर स्वच्छ करणे 

नाभीमध्ये कडुलिंब किंवा एरंडेल तेल लावल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि यकृत निरोगी राहते.

नाभीत तेल लावण्याची योग्य पद्धत काय?

डॉ. हंसाजी तुमच्या गरजेनुसार तेल निवडण्याचा सल्ला देतात. यानंतर, तेल हलके गरम करा. आता रात्री झोपण्यापूर्वी, नाभीत कोमट तेलाचे काही थेंब टाका. बोटांच्या मदतीने हलक्या हाताने मालिश करा आणि रात्रभर असेच राहू द्या. 

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24