सॅमसंग किंवा वनप्लस फोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये चांगली ऑफर आहे. या बंपर ऑफरमध्ये तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ एस आणि वनप्लस नॉर्ड ४ हे दोन्ही स्मार्टफोन २ हजार रुपयांच्या कूपन डिस्काउंटसह खरेदी करू शकता. फोनवर तुम्हाला जबरदस्त कॅशबॅक आणि बँक डिस्काउंट देखील मिळू शकतो. याशिवाय, एक्स्चेंज ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत आणखी कमी करू शकता. परंतु, एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.