जिओफायबरचा तीन महिन्यांचा पोस्टपेड प्लॅन असलेला ३० एमबीपीएस प्लान २ हजार २२२ रुपयांत मिळणार आहे. या प्लानमध्ये ३० एमबीपीएसच्या डाउनलोड आणि अपलोड स्पीडसह अनलिमिटेड डेटा दिला जाणार आहे. तसेच मोफत व्हॉईस कॉलिंग आणि ८०० टीव्ही चॅनल्सचा अॅक्सेस मिळणार आहे. याशिवाय, जिओला ९० दिवसांसाठी या प्लानसोबत १०१ रुपयांचा १०० जीबी अतिरिक्त डेटा मोफत दिला जात आहे. याशिवाय ग्राहकांना डिस्ने+ हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी ५, जिओसिनेमा प्रीमियम, सन एनएक्सटी, होईचोई, डिस्कव्हरी+, ऑल्ट बालाजी, इरॉस नाऊ, लायन्सगेट प्ले, शेमारूमी आणि ईटीव्ही विन (जिओ टीव्ही+ द्वारे) मोफत पाहता येणार आहे.