Reliance Power Share Price : अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स पॉवरच्या शेअरनं प्रतिकूल परिस्थितीतही आपली पॉवर दाखवून दिली आहे. गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळत असतानाही या कंपनीत तेजी कायम होती. सलग अकराव्या सत्रात या शेअरला अप्पर सर्किट लागलं असून हा शेअर ५३.६४ रुपयांवर पोहोचला आहे. जानेवारी २०१८ नंतरचा हा उच्चांक आहे. गेल्या ११ दिवसांच्या कालावधीत कंपनीचा शेअर ७१ टक्क्यांनी वधारला आहे.