Flipkart Big Billion Days: फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग बिलियन डे सेलमध्ये स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी स्वस्तात उपलब्ध आहेत. दरम्यान, उत्तम सेल्फी कॅमेरा असलेला फोन खरेदी करण्याचा विचार करत असणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. या सेलअंतर्गत ग्राहक ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असलेला मोटोरोला एज ५० प्रो मोठ्या सवलतीसह खरेदी करू शकतात. फोनच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. बिग बिलियन डे सेलमध्ये हा फोन १ हजार २५०रुपयांपर्यंत बँक डिस्काउंटसह खरेदी करता येईल.