पाकिस्तानी कलाकाराविरोधात मनसे आक्रमक: ‘अबीर गुलाल’ प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही; मनसे नेते अमेय खोपकर यांचा विरोध – Mumbai News



‘अबीर गुलाल’ या चित्रपटाचा टीझर मंगळवारी प्रदर्शित झाला. यात पाकिस्तानी कलाकार फवाद खान पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, त्याचे हे पुनरागमन अनेक अडचणीशिवाय राहणार नाही, असेच चित्र आता दिसून येत आहे. टीझर प्रदर्शित झाल्य

.

“निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली तेव्हाच आम्हाला या चित्रपटाच्या प्रदर्शनाची माहिती मिळाली. परंतु आम्ही हे स्पष्ट करत आहोत की आम्ही हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही कारण त्यात पाकिस्तानी कलाकार आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही अशा चित्रपटांना राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही. आम्ही चित्रपटाबद्दल अधिक माहिती जमा करत आहोत आणि लवकरच संपूर्ण निवेदन जारी करू,” असे मनसेचे प्रवक्ते अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.

या वादावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय निरुपम म्हणाले की, “भारतात पाकिस्तानबद्दल व्यापक द्वेष आहे. जेव्हा पाकिस्तानचा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा भारतीय प्रेक्षक तो पाहणे पसंत करत नाहीत. जरी काही लोक उत्सुकतेने तो पाहत असले तरी, पाकिस्तानी कलाकारांना भारतात कधीही व्यापक यश मिळू शकलेले नाही. जर केंद्र सरकारचे याबाबत धोरण असेल तर ते अंमलात आणले पाहिजे. पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करावेत किंवा त्यांच्या कलाकारांना येथे काम करण्याची परवानगी द्यायचा निर्णय सरकारने घ्यावा.”

‘अबीर गुलाल’ प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही

या संदर्भात अमेय खोपकर यांनी एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, हे इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच. मग त्यांना कचऱ्यात टाकायचं काम मन-सैनिकांनाच करावं लागणार आणि आम्ही ते करणार, करत राहणार… ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही. ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय त्यांनी खुशाल घ्या, पण लक्षात ठेवा सामना आमच्याशी आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24