९०च्या दशकातील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘शक्तिमान.’ या मालिकेने थोरामोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनाच वेड लावले होते. या मालिकेत अभिनेते मुकेश खन्ना हे शक्तिमानच्या भूमिकेत होते. आता मुकेश खन्ना हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी विशेष ओळखले जातात. अनेकदा त्यांना या सर्वामुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. मुकेश हे ६६ वर्षांचे झाले असून त्यांनी अद्याप लग्न केलेले नाही. पण त्यांनी लग्न का केले नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता स्वत: मुकेश यांनी यावर वक्तव्य केले आहे.