मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील दोन नावे म्हणजे प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी. हे दोनही कलाकार आजवर आपण एकत्र काम करताना पाहिले नाहीत. आता त्यांचा ‘जिलबी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.