अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने नुकतीच आगामी ९७ व्या अकादमी पुरस्कारासाठी १० श्रेणींमध्ये निवड झालेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली. ‘लपता लेडीज’ हा चित्रपट भारताकडून ऑस्कर २०२४साठी निवडण्यात आला होता. पण आता हा सिनेमाची आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मच्या यादीत निवड न झाल्यामुळे सर्वांना वाईट वाटत आहे. चित्रपटातील अभिनेत्री छाया कदम यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.