Thukra Ke Mera Pyar Web Series : सध्या प्रेक्षकांचा कल ओटीटी विश्वाकडे वाढू लागला आहे. यातच काही वेब सीरिज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहेत. अशीच एक वेब सीरिज सध्या सगळीकडे ट्रेंड होताना दिसत आहे. ‘ठुकरा के मेरा प्यार’ असे या वेब सीरिजचे नाव असून, ही सर्वाधिक पाहिली गेलेली सीरिज बनली आहे. प्रेमावर आधारित असलेली ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. लोकांना ही वेब सीरिज इतकी आवडली आहे की, सगळेच तिचं तोंडभरून कौतुक करत आहेत. चल जाणून घेऊया सीरिजबद्दल अधिक…