Nostalgia Old TV Serials: आता जरी भरपूर ओटीटी प्लॅटफॉर्म आले असले, तरी ९०च्या दशकांत दूरदर्शन हे एकमेव मनोरंजनाचे साधन होते. यावर लागणाऱ्या मालिका अगदी आताच्या नेटफ्लिक्स आणि इतर ओटीटी माध्यमांना मागे टाकतील अशा होत्या. या काळात मोजक्याच मालिका प्रदर्शित होत असल्याने संपूर्ण कुटुंब एकत्र बसून या मालिका बघायचे. यातही एक वेगळीच मजा असायची. ८० आणि ९०च्या दशकातील लोक दूरदर्शनवर विविध प्रकारच्या शीर्ष मालिका पाहत मोठे झाले आहेत. यापैकी काही डेली सोप तर अशा होत्या की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील लोक ते पाहण्यासाठी आतुरतेने वाट बघायचे. आजही त्या मालिकांची नावे प्रत्येकाच्या ओठावर आहेत. यातील काही मालिका इतक्या प्रसिद्ध आहेत की, आजही लोक त्यांना यूट्यूबवर पाहतात.