Tharala Tar Mag 17 October 2024 Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात आश्रम केस संदर्भात एक मोठी अपडेट पाहायला मिळणार आहे. सायली आणि अर्जुन कोर्टाची परवानगी घेऊन आश्रमामध्ये तपास करण्यासाठी गेले आहेत. साक्षी आणि प्रिया विरोधातील पुरावे शोधूनच काढायचे आणि मधु भाऊंना जेलमधून निर्दोष मुक्त करायचे, असा विडाच सायली आणि अर्जुन यांनी उचलला आहे. आता सायली आणि अर्जुन यांच्या सोबतीलाच चैतन्य देखील या आश्रमात जाणार आहेत. तिघेही मिळून आश्रमाच्या चारही दिशा पिंजून काढणार आहेत. या आश्रमातून कोणता पुरावा सापडतो का, याची ते कसून तपासणी करणार आहेत. दरम्यान, अर्जुनला आश्रमातील एका खाटेखाली सोन्याच्या दागिन्याचा एक तुकडा सापडतो. मात्र, हा नेमका कसला तुकडा आहे, याचा उलगडा झालेला नाही.