Atul Parchure passed away: मराठी मालिका, नाटक आणि चित्रपट, इतकंच नव्हे तर हिंदी मालिका आणि चित्रपटातूनही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अतुल यांची निधनाची बातमी कळताच संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.