Sushant Singh Rajput House: ‘द करेळ स्टोरी’मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे अदा शर्मा. या चित्रपटाने अदाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. जेव्हा अदा शर्मा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या घरी शिफ्ट झाली तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या. तिला सुशांतच्या नावाने प्रसिद्धी हवी आहे, असंही काही लोकांनी म्हणत तिला ट्रोल केले होते. अदाला अनेकदा विचारले जाते की घरात तिला कसे वाटत आहे. त्यावर अदाने देखील प्रतिक्रिया दिली आहे.