बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबई महानगर पोलिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील लोखंडवाला जंक्शनला आता ‘श्रीदेवी चौक’ असे नाव देण्यात आले आहे. या रस्त्यावरील ग्रीन एकर्स टॉवरमध्ये श्रीदेवी राहत होत्या. श्रीदेवी या
.

या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम आज, शनिवारी (12 ऑक्टोबर) सायंकाळी 6 वाजता होणार आहे. बोनी कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. वास्तविक 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवीचे अनपेक्षित निधन झाले होते. हा चित्रपट उद्योग आणि तिच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा वारसा त्यांच्या अभिनयाची जादू चाहत्यांच्या आयुष्यात कायम आहे आणि त्यांच्या आठवणी श्रद्धांजलीच्या रूपात जिवंत आहेत.

दरम्यानच्या काळात श्रीदेवीच्या जीवनावर बायोपिक बनवण्याच्या अफवाही समोर आल्या होत्या. मात्र, त्यांचे पती बोनी कपूर यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेतला आहे. एका मुलाखतीत बोनी कपूर म्हणाले की, “ती खूप खासगी व्यक्ती होती आणि तिचे आयुष्य खासगी राहिले पाहिजे. मला वाटत नाही की असे कधी होईल. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी हे होऊ देणार नाही.”
राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा….
यंदा उलथापालथ करावीच लागेल:मनोज जरांगेंचा महायुती सरकारला इशारा; आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुख्य भूमिका जाहीर करणार

बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी असलेल्या शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणगडावर आज मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 300 एकरांत मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा पार पडला. यावेळी जरांगे यांनी सरकारला आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही, तर नाईलाजाने उलथापालथ करावीच लागेल असा निर्वाणीचा इशारा दिला. पूर्ण बातमी वाचा…
झाडावरची शस्त्रे आता उतरवा, ही क्रांतीची वेळ, वचपा घेण्याची वेळ:दसऱ्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांचा मतदारांशी संवाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. कोणीही बेसावध राहू नका, शमीच्या झाडावरील शस्त्रे आता उतरवा, ही क्रांतीची वेळ आली आहे. ही वचपा घेण्याची वेळ आहे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. या सगळ्यांचा तुम्हाला आता वेध घ्यावा लागणार असल्याचे आवाहन देखील राज ठाकरे यांनी जनतेला केले आहे. दसऱ्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. पूर्ण बातमी वाचा….
देवेंद्र फडणवीसांकडून होमगार्ड्सना दसरा गिफ्ट:मानधन दुप्पट करण्याचा निर्णय, प्रतिदिवस 570 रुपयांवरून 1083 रुपये

राज्यभरात विजया दशमीचा उत्साह सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील होमगार्डचे मानधन जवळपास दुप्पट करणार असल्याची घोषणा केली आहे. या संबंधीचा शासन आदेश देखील जारी करण्यात आला आहे. 1 ऑक्टोंबर पासून राज्यातील होमगार्डला ही वाढ देण्यात येणार आहे. पूर्ण बातमी वाचा…