माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकीय विश्वासह बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. ही बातमी समजताच बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान ‘बिग बॉस १८’चं शूटिंग मध्येच थांबवून ताबडतोब वांद्रे येथील लिलावती हॉस्पिटलला रवाना झाला होता. दुसरीकडे, मृत्यूची बातमी मिळताच संजय दत्त रुग्णालयात पोहोचला होता. बाबा सिद्दीकी हे सलमान आणि संजय दत्त यांच्या खूप जवळचे होते. विशेष म्हणजे एका पार्टीत शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यात भांडण झाल्याची बातमी चर्चेत आली तेव्हा बाबा सिद्दीकीयांनी पुन्हा दोघांना मिठी मारून मैत्री केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.