Sangeet Manapmaan Movie: विविधांगी विषयावर चित्रपट बनवण्याची परंपरा मराठी सिनेसृष्टीला लाभली आहे. काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याच्या उद्देशाने नवनवीन संकल्पनांवर अनेक दिग्दर्शक काम करत असतात. काही संगीतमय चित्रपटांनादेखील मराठी इंडस्ट्रीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळते. ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीतमय नजराण्यानंतर आता ‘संगीत मानापमान’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात संगीताचा एक अद्भूद संगम पाहायला मिळणार आहे. त्यात तगडी स्टार कास्ट. चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.